सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
‘इथं तिथं चर्चा तुमची हो झाली…नावाला तुमच्या डिमांड आली..’ हे गाणं महाराष्ट्रात धुमाकूळ घालत तरुणांमध्ये विशेष क्रेझ निर्माण करत असताना इंदापूरच्या आण्णाने ही लोकांच्या मनात घर करत आपली विशेष ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे.आण्णा सामाजिक क्षेत्रात क्रियाशील असून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
सध्या इंदापुरात राजकीय वातावरण गरम होत असताना दौऱ्याच्या निमित्ताने चाललेल्या आजी-माजी मंत्र्यांनी काल इंदापूरच्या ‘पकाच्या चहा’च्या टपरीवर अनिल उर्फ आण्णा पवार ला पाहिले व आजी-माजी मंत्र्यांनी आपल्या गाड्या तात्काळ साईडला घेतल्या. एवढेच नव्हे, तर आवर्जून अण्णाबरोबर चहा घेतला व ख्यालीखुशाली विचारत चर्चा केली. आजी- माजी मंत्र्यांबरोबर अण्णा बरोबर चहा घेतल्याची चर्चा अख्ख्या इंदापुरात झाली..!
इंदापूर नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच प्रभागातील तरुण वर्गाने ‘आमचे मेंबर’ म्हणून चर्चेत आणलेल्या व सध्या फार्मात असणाऱ्या आण्णाने नगरपालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी तयारीही केली आहे.
नुकताच टोलेजंग वाढदिवस करून अण्णाने आपली ताकद आजमावत शहरातील सर्व वॉर्डाच्या नेत्यांना बोलावून आपण तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यावेळीही आजी-माजी मंत्र्यांनी अण्णाच्या सामाजिक कार्याचा गोडवा गात चाचपणीही केली.
त्यातच काल दुपारी अण्णा पवार चहाच्या टपरीवर पत्रकारांशी गप्पा मारत असताना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अण्णाला पाहून आपली गाडी साईडला घेण्यास चालकाला सांगून अण्णा बरोबर चर्चा करून चहाचा आस्वाद घेतला.
एवढेच नव्हे तर आताचे चहाचे बील अण्णा च्या नावावर मांडा असे पकाच्या चहा चे मालक प्रकाश खांबसवाडकर यांना गमतीने सांगत मनमुरादपणे अण्णा बरोबर व पत्रकारांबरोबर चर्चा करत गप्पा मारल्या. तसेच विविध विषयांवर चर्चा केली.
त्यानंतर पंधरा मिनिटांच्या अवधीनंतर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हेही त्या रस्त्याने दौऱ्यावर जात असताना त्यांनीही आण्णास पाहून गाडी साईडला घेत त्याच ठिकाणी अण्णा बरोबर चहाचा आस्वाद घेतला. यावेळी राज्यमंत्र्यांनी व पत्रकारांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.
अनिल (आण्णा) पवार यांचे सामाजिक कार्य आपल्या प्रभागात नव्हे तर संपूर्ण इंदापूरमध्ये नावारूपाला आले आहे. त्यामुळे त्यांची भावी नगरसेवक म्हणून चर्चा जोरात चालू आहे. गत निवडणुकीमध्ये ‘अपक्ष’ म्हणून सहजपणे प्रयोग म्हणून नशीब आजमावणा-या अण्णाला 30 मतांनी हुलकावणी दिली असली तरी अण्णा ची ताकद मोठी होती हे सर्व राजकीय पक्षांनी त्यावेळी एक प्रकारे मान्यच केले होते.
कारण अपक्ष असताना लढत देणे इतकी सोपी बाब नव्हती.मात्र अण्णा ने सामाजिक कार्याचा प्रचंड झपाटा लावला. व सध्या चर्चेचा विषय बनला. अनिल ऊर्फ अण्णा पवार कोणत्या पक्षातून नगरपालिका निवडणुकीला उभे राहतील हे आज जरी सांगता येत नसले तरी आण्णाची चर्चा मात्र इंदापूर शहरात खूपच रंगली आहे.