बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीसह पंचक्रोशीतील साहित्यिक आणि रसिक प्रेक्षकांसाठी खुशखबर!! दीड वर्षाच्या मोठ्या खंडानंतर पुन्हा एकदा बारामतीकरांची आवडीची परिवर्तन व्याख्यानमाला आजपासून कार्यरत होत आहे. ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि शारदा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेली परिवर्तन व्याख्यानमाला आजपासून पुन्हा सुरू होत आहे. आज रविवारी (ता.5) प्रसिद्ध इंडोलॉजी स्टडी व कवी डॉक्टर राहूल देशपांडे हे जाऊ देवाचिया गावा या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
देऊळ म्हणजे पूर्वजांचे घर! आपल्या पूर्वजांनी मोठ्या कुशलतेने हा इतिहास अगदी कोरून ठेवलेला आहे. मुर्त्यांमधून, खांबांमधून, प्रदक्षिणेच्या पथावरून, तोरणं यातून, लल्लाट बिंबातून, गाभाऱ्यातून तो इतिहास पुरुष आपल्याशी बोलत असतो. एक देऊळ म्हणजे, त्या त्या परिसराचा एक विकिपीडिया असतो. अनेकांना तो माहित नसतो त्या इतिहासाला त्या इतिहास पुरुषाला समजून घेण्याची त्याच्याशी संवाद साधण्याची आणि आपल्या जगण्याचा असा पुन्हा नव्याने करण्याची आज गरज आहे देवालयाची भाषा आणि देवालयातील देवो हे जाणून घेण्यासाठी आज परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉक्टर राहूल देशपांडे यांचे हे व्याख्यान ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती व भगिनी मंडळ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने होणार आहे.
हे व्याख्यान दृकश्राव्य माध्यमातून होणार असून, देवळांची भाषा समजून घेताना बारामती चा इतिहास देखील यातून मांडला जाणार आहे. रविवारी पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता आप्पासाहेब पवार सभागृह शारदानगर येथे हे व्याख्यान वेळेत सुरू होईल अशी माहिती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दिली.
परीवर्तन व्याख्यानमालेने बारामती तालुक्यातील रसिकप्रेक्षकांना अनेक दिग्गजांची ओळख करून दिली. अनेकविध यशोगाथा लोकांच्या समोर आल्या. अनेकविध मनोरंजन आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांची झलक दाखवून दिली. परिवर्तन व्याख्यानमालेच्या व्याख्यानाची दर महिन्याला लोकांना उत्सुकता असायची, परंतु कोरोना च्या काळात यामध्ये खंड पडला. आता पुन्हा एकदा वातावरण निवळत असतानाच लोकांच्या मनात असलेली ही व्याख्यानमाला पुन्हा एकदा लोकांच्या सेवेत रुजू झाली आहे.