बीड : राज्य शासनाने घोषित केलेल्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेंतर्गत हॉटेल समाधान येथे सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, तहसीलदार किरण अंबेकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सचिन खाडे आदि उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर राज्यभरात शिवभोजन योजना सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 50 पेक्षा अधिक ठिकाणी शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालया समोरील हॉटेल समाधान येथे हे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या भोजनाची माहिती घेतली. यावेळी शेख मन्सूर शेखचाँद, महादेव भारती महाराज, दामू जोगदंड, आनंद पडुळे आणि नवनाथ भोंडगे या लाभार्थींनी शिवभोजन केंद्रातील भोजनाचा आस्वाद घेतला.










