• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ई-कॉमर्स कंपन्यांकडून होणारी नियमबाह्य विक्री थांबवण्याची
ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maha News Live by Maha News Live
May 23, 2021
in सामाजिक, शिक्षण, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

लॉकडाऊन काळातील मोबाईल रिटेलर्सच्या समस्या सोडवण्याची ऑनलाईन संवादावेळी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुणे : महान्यूज लाईव्ह

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात दीड महिन्यापासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य सर्व व्यापार बंद आहे. सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाईल रिटेलर्सनेही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत.

परंतु या काळात विदेशी ई-कॉमर्स कंपन्या (फ़्लिपकार्ट आणि अमेझॉन) शासनाच्या नियमांना बगल देत सर्रास इतर वस्तूंचीही राजरोस विक्री करत आहेत. या नियमबाह्य प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेत संबंधित विभागाला माहिती घेऊन नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

लॉकडाऊन काळातील विविध समस्या मांडण्यासाठी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी असोसिएशनचे संस्थापक चेअरमन कैलाश लखयानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष विभूति प्रसाद, राष्ट्रीय सरचिटणीस भावेश सोळंकी, सहसचिव नवनीत पाठक, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, राज्य सरचिटणीस जुझेर ढोरजीवाला आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले होते.

अजित जगताप यांनी कोरोनाला थोपविण्यासाठी राज्य सरकारकडून होत असलेल्या प्रभावी उपाययोजना, तसेच रुग्णसंख्येत झालेली घट याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील मोबाईल रिटेलर्सनी ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांचे जबाबदारीने पालन केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भावेश सोळंकी यांनी या मिटींगसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून वेळ देत असोसिएशनच्या समस्यांची आस्थेवाईकपणे नोंद घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आभार मानले.

विभूति प्रसाद, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करताना सरकारने ई कॉमर्स कंपन्याना फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अनेक विदेशी कंपन्या मोबाईल तसेच इतर वस्तुंची सर्रास विक्री करत आहेत. रिटेलर्स प्रामाणिकपणे नियम पाळत असताना या कंपन्या नियम पायदळी तुडवून विक्री करतात. यामुळे रिटेलर्सचे मोठे नुकसान होत असून, सरकारने यावर निर्बंध घालावेत.

काय आहेत मागण्या?

ई-कॉमर्स कंपन्यांना अवैध विक्री करण्यास रोखावे. मोबाईल दुकाने बंद असल्याने वीज बिलांच्या स्थिर आकारात सवलत मिळावी. लॉकडाऊननंतर ग्राहकांना निर्धोकपणे दुकानात येऊन खरेदी करता यावी यासाठी व्यावसायिक व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे. असोसिएशनच्या समस्या मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा.

व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या विविध मागण्यांचा सरकार सकारात्मक विचार करेल. राज्यात सर्वच घटकांचे जलद लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. व्यापारी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यानुसार लवकरच स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क व सॅनिटाजरचा वापर याविषयी प्रत्येक रिटेलर्सने स्वतः तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. येत्या काळात जास्तीत जास्त मोबाईल रिटेलर्सबरोबर झूम मिटींगद्वारे संवाद साधायला आवडेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Next Post

एकाच गुन्ह्यात दोघे आरोपी! जोडीदारालाच कसा जामीन मिळाला? म्हणून पॅरोलवर आलेल्या आरोपीने जोडीदाराच्या भावावर केला हल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group