पुणे : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या आढावा बैठकीत आज पुणे शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला. यामध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मॉल सिनेमागृह पुढील सात दिवसांसाठी बंद होणार असून पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार आहे. याखेरीज सकाळी सहापर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पुणे शहरात संचारबंदी आणि दिवसभर जमावबंदी लागू राहिल.
पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरती नियंत्रण आणण्याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरातील कोरोनाशी संबंधित सर्व आढावा घेण्यात आला. यामध्ये दररोज पुण्यामध्ये चार हजाराहून अधिक रुग्ण आढळत असल्याने, पुढील पंधरा दिवसाकरीता काही गोष्टी, कठोर निर्णय घेण्याची गरज आहे असे मत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानुसार वरील निर्णय घेण्यात आला. नागरिक काळजी घेत नसल्याने ही बेफिकिरी कमी करण्यासाठी ही संचार बंदी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
पुण्याचा युक्त सौरभ राव हेही या बैठकीस उपस्थित होते त्यानंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली यामध्ये पीएमपीएल बस सेवा पुढील सात दिवसासाठी बंद राहणार असून धार्मिक स्थळे देखील बंद आहेत असे पर्यंत पुण्यातील शाळा महाविद्यालय बंद राहणार असून नियोजित असलेल्या परीक्षा मात्र होतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.











