पुणे : महान्यूज लाईव्ह
कॅम्प मधील आगीत नुकसान झालेल्या फॅशनस्ट्रीट मार्केटला भेट देऊन हॉकर्स आणि स्टॉल मालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन भाई शेख यांनी चर्चा केली.
या मार्केटमध्ये ऍक्सेसरीज आणि कपड्यांचे सुमारे 600 स्टॉल्स व दुकाने पूर्णपणे जळून खाक झाले. अनेक जण मौल्यवान वस्तू या आगीमध्ये गमावून बसले आहेत. याचा सुमारे 1500 कुटुंबांवर दुर्दैवी परिणाम झाला. हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसीन शेख यांनी यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्या गरजू लोकांना रेशन व अन्य मदत देणार असल्याचे सांगितले आहे. व त्यांच्या सोबत आम्ही उभे आहोत व हे क्षेत्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कक्षेत येत असल्याने शेख यांनी पुणे छावणी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनाही विनंती करणार असल्याचे सांगितले. यावेळी वसीम कुरेशी, न्यू युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख व व्यापारी उपस्थित होते.











