• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्याच्या पायाखालची वाळू सरकली… पण विषय कितीही गंभीर असला की ‘अजितदादा’ खंबीर असतात हे त्याला माहीत होते!

Maha News Live by Maha News Live
February 28, 2021
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती: महान्यूज लाईव्ह

सरकारी नोकरी करून घरच्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अपेक्षेने आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेसाठी तो बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथून निघाला.. वेळेवर पोचायचे म्हणून लवकर निघाला.. तो 200 किलोमीटरवर दापोलीला पोहोचलाही.. अत्यंत उत्साहाने तो प्रवेश पत्र घेऊन आत जाणार, तेवढ्यात प्रवेशद्वारातच त्यास अडवले आणि तुझी परीक्षा आता होणार नाही..तुला आता आज सोडता येणार नाही असे त्याला सांगितले गेले आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.. त्याला रडू कोसळले.. पण काही क्षणातच त्याने खंबीर पर्याय निवडला..! काटेवाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांनी फोन केला.. सगळी माहिती सांगितली, तिथून त्याला अजित दादांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांचा फोन नंबर मिळाला.. अन् विषय कितीही गंभीर असला, तरी अजितदादा त्यास खंबीर असतात.. यावर तसा असलेला विश्वास आणखीनच दृढ झाला…!

महेश लकडे याची ही कहाणी तशी पाहिल्यास अगदी इतरांसाठी फारशी गंभीर नसेलही… पण त्याच्या दृष्टीने ती फारच महत्त्वाची होती, कारण त्याच्या आयुष्याचा हा प्रश्न होता.! आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी वराडकर महाविद्यालय दापोली येथे त्याचे परीक्षा केंद्र होते. त्यासाठी तो आज घाईगडबडीत तेथे पोहोचला. पोहोचल्यानंतर त्याचे प्रवेश पत्र पाहिल्यानंतर तेथील पर्यवेक्षकांनी इथे तुझी परीक्षा नाही, हे केंद्र तुझे नाही असे सांगत आता तुला परीक्षा देता येणार नाही असे स्पष्ट केले.

खूप मोठी स्वप्न घेऊन गेलेल्या महेशला हे सगळे अनपेक्षित होते. त्यामुळे त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याला काहीच समजेना.. जर आता आपला प्रवेश मिळाला नाही तर काय करायचे? अशा विवंचनेत तो रडकुंडीला आला.. थोड्याच वेळात त्याने काटेवाडी येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर संपर्क साधून, तेथे ही माहिती दिली. तेथील लोकांनी त्यास सुनिलकुमार मुसळे यांना संपर्क करण्यास सांगितले. त्याने श्री मुसळे यांना फोन लावला आणि सर्व माहिती सांगितली.

त्यानंतर फक्त दहा मिनिटात सगळी चक्रे फिरली. श्री मुसळे यांनी अजित पवार यांना कल्पना देऊन, रत्नागिरीतील निवासी उपजिल्हाधिकारी यांना संपर्क साधला व हे प्रकरण गंभीर असल्याने त्या तातडीने लक्ष घालावे असे सांगितले. त्यानंतर संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी देखील तातडीने चक्रे हलवली. स्वतः दापोली महाविद्यालयात जाऊन तेथील वस्तुस्थिती समजून घेतली आणि परीक्षेसाठी त्याला आत प्रवेश मिळाला.. आणि त्याला हायसे वाटले..

महेश लकडे, परिक्षार्थी – मला माहित होते, कितीही अडचणी आल्या तरी अजितदादांना फक्त एक फोन केला, तरी यातून मार्ग निघेल याची मला खात्री होती. एवढ्या दूरवर आल्यानंतर, परीक्षा केंद्र सापडल्यानंतर देखील तिथे प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे मला काय करावे ते सुचत नव्हते, मात्र मुसळेसाहेबांनी यातून लगेच मार्ग काढला आणि अवघ्या दहा मिनिटात मला आज प्रवेश देखील मिळाला.

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारAjit PawarDCM Ajit Pawar
Next Post

संजय राठोड आज राजीनामा देणार? की उद्या मुख्यमंत्रीच घोषणा करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group