मुंबई : महान्यूज लाईव्ह
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार स्वतः संजय राठोड आज राजीनाम्याची घोषणा करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले असून भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या मुद्द्यात महाविकास आघाडी सरकारचे देखील अब्रू पणाला लागली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्याचा व त्यांच्यावरील कारवाईचा दबाव सरकारवर वाढला असून, आज सकाळपासून पोहरादेवीत देखील महंतांच्या बैठका सुरू आहेत. पोहरादेवी मंदिराचे महंत हे संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून सरकारवर दबाव वाढत आहेत, तर दुसरीकडे माध्यमांनी सरकारवर दबाव वाढवला आहे.
अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना बोलावून निर्णय तुझा तू घे तशी सूचना केल्याचे समजते, मात्र अजूनही संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची घोषणा करतील असे बोलले जात आहे.
चित्रा वाघांचा आवाज! पूजासाठी की, किशोर वाघांसाठी?
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीका केली, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक स्त्रोतांची बेकायदा संपत्ती जमा केल्याचा आरोप करत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केली. या कारवाईवरून हे राजकीय षडयंत्र असल्याची टीका भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकासआघाडीचे समर्थक मात्र किशोर वाघ यांच्यावर याआधीच ही कारवाई भाजपने केली असती, त्यामुळेच किशोर वाघ यांच्या प्रकरणावरून चित्रा वाघ या भाजपमध्ये सामील झाल्या अशी टीका करत आहेत.











