• Contact us
  • About us
Saturday, October 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील एकदम रंजक मतमोजणी! पसंतीक्रमाचे गणित आणि विजयाचा कोटा..

mahaanewslive by mahaanewslive
October 25, 2026
in यशोगाथा, मनोरंजन, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील एकदम रंजक मतमोजणी! पसंतीक्रमाचे गणित आणि विजयाचा कोटा..

अनिल आलुरकर, (उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, अमरावती)

​लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्या उमेदवाराला प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक मतही जास्त मिळते, तो सरळ विजयी घोषित होतो. परंतु, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यापेक्षा पूर्णपणे वेगळी, उत्कंठावर्धक आणि डोक्याला खुराक देणारी असते. इथे केवळ आघाडी मिळवून चालत नाही, तर विजयासाठी ठरवून दिलेला ‘विहित कोटा’ पूर्ण करणे अनिवार्य असते. एकल संक्रमणीय गुप्त मतदान पद्धतीवर आधारलेली ही मतमोजणी नेमकी कशी चालते आणि मतांचे हस्तांतरण कसे होते, हे एका साध्या उदाहरणावरून समजून घेऊया.

​समजा, एका मतदारसंघात एकूण १०,००० वैध मते पडली आहेत. या पद्धतीत विजयाचा कोटा ठरवण्याचे एक निश्चित सूत्र असते—एकूण वैध मतांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा एक मत जास्त. म्हणजेच, प्रस्तुत उदाहरणात ज्या उमेदवाराला विजयाची माळ गळ्यात घालायची असेल, त्याला किमान ५,००१ मते मिळवणे बंधनकारक ठरते. हा विजयाचा कोटा गाठल्याशिवाय कोणीही विजयी होऊ शकत नाही.

​मतमोजणीच्या पहिल्या फेरीत केवळ ‘पसंती क्रमांक १’ ची मते मोजली जातात. चार उमेदवारांच्या रिंगणात पहिल्या फेरीअखेर उमेदवार ‘अ’ ला ४,००० मते, उमेदवार ‘ब’ ला ३,००० मते, उमेदवार ‘क’ ला २,००० मते आणि उमेदवार ‘ड’ ला १,००० मते मिळाली आहेत. येथे उमेदवार ‘अ’ सर्वाधिक ४,००० मते घेऊन आघाडीवर असला, तरी विजयाच्या ५,००१ च्या कोट्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत कोणाचाही विजय निश्चित होत नाही आणि प्रक्रिया दुसऱ्या फेरीत प्रवेश करते.

​दुसऱ्या फेरीत सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला शर्यतीतून बाहेर (Eliminate) केले जाते. येथे उमेदवार ‘ड’ याला सर्वात कमी म्हणजे १,००० मते मिळाल्याने त्याला बाद ठरवले जाते. बाद झालेल्या उमेदवार ‘ड’ ची ही १,००० मते वाया जात नाहीत, तर त्या मतपत्रिकांवर मतदारांनी दिलेली दुसरी पसंती तपासली जाते. या छाननीमध्ये ६०० मतदारांची दुसरी पसंती उमेदवार ‘अ’ ला, ३०० मतदारांची दुसरी पसंती उमेदवार ‘ब’ ला आढळली, तर उर्वरित १०० मतपत्रिकांवर पुढील पसंती नसल्याने ती अवैध ठरली.

​ही मते संबंधित उमेदवारांच्या खात्यात जोडल्यानंतर नवीन समीकरण समोर येते. उमेदवार ‘अ’ ची मते ४,००० वरून ४,६०० होतात, उमेदवार ‘ब’ चे पारडे ३,००० वरून ३,३०० वर पोहोचते, तर उमेदवार ‘क’ २,००० मतांवर जैसे थे राहतो. अजूनही कोणाकडेही आवश्यक असलेला ५,००१ मतांचा कोटा नसल्यामुळे मतमोजणी तिसऱ्या फेरीत जाते.

तिसऱ्या फेरीत पुन्हा सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आता उर्वरित तिघांमध्ये उमेदवार ‘क’ कडे सर्वात कमी म्हणजे २,००० मते असल्याने तो बाद होतो. त्यानंतर उमेदवार ‘क’ च्या २,००० मतपत्रिका तपासून त्यावरील पुढील पसंतीक्रम मोजला जातो. या तपासणीत १,२०० मतदारांनी पुढील पसंती उमेदवार ‘अ’ ला, तर ५०० मतदारांनी उमेदवार ‘ब’ ला दिल्याचे स्पष्ट होते; तसेच ३०० मते पसंतीक्रम नसल्याने हस्तांतरित होत नाहीत. ही मते जमा झाल्यावर निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होते. उमेदवार ‘अ’ कडे ४,६०० अधिक १,२०० अशी मिळून तब्बल ५,८०० मते होतात, तर उमेदवार ‘ब’ कडे ३,३०० अधिक ५०० अशी ३,८०० मते जमा होतात. विजयासाठी आवश्यक असलेला ५,००१ चा कोटा उमेदवार ‘अ’ ने लीलया पार केल्यामुळे त्याला अधिकृतपणे विजयी घोषित केले जाते.

​या आकडेवारीवरून हेच स्पष्ट होते की, पहिल्या फेरीत उमेदवार ‘अ’ कडे विजयासाठी १,००१ मते कमी असतानाही बाद झालेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या जोरावर त्याचा विजय सुकर झाला. शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ एका उमेदवाराला दिलेले मत निर्णायक ठरत नाही, तर मतदाराने नोंदवलेला प्रत्येक पसंतीक्रम विजयाची गणिते बदलू शकतो. त्यामुळेच ही मतमोजणी अत्यंत वेळखाऊ, क्लिष्ट आणि शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारी ठरते.

Next Post
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

गंभीर जखमी होता राणा.. आता गेला कुणीकडे? बारामतीतील कथित हल्ला प्रकरण : पोलिसांच्या चौकशीपूर्वीच राणा रुबी हॉलमधून गायब?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group