इंदापूर : महान्युज लाईव्ह
इंदापूर शहरात प्रथमच अनेक खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन कोविड हॉस्पिटल उभा करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सिद्धिविनायक कोरोना रुग्णालय तयार झाले असून आज सोमवारी प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. के.इनामदार व बारामतीचे प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या उपस्थितीत याची सुरुवात होत आहे.
इंदापुरातील या सिध्दीविनायक कोविड हॉस्पिटलमध्ये 30 बेडच्या या रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा, एच एफ इन ओ, मॉनिटर्स, सेन्ट्रल ऑक्सिजन, डुरा सिलिंडर, ऑक्सिजन बेडस, फार्मसी, पॅथॉलॉजी लॅब, कोविड ओपिडी, आयसोलेशन बेडस, इमर्जन्सी ऑक्सिजन बेडस अशा सुविधा असणार आहेत.
हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रमुख डॉ.बाळासाहेब राऊत यांनी याबाबत माहिती दिली, महाराष्ट्र शासनाच्या नियमित केलेल्या दरानुसारच हॉस्पिटल मध्ये उपचार शुल्क आकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ अविनाश पाणबुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सागर दोशी, डॉ. मंगेश पाटील, डॉ. ऋषीकेश गार्डे आदी तज्ज्ञ रूग्ण सेवा देणार आहेत.










