नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक महिन्यांपासून पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याच्या संदर्भात विरोधकांपासून ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत बरीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. याच परिस्थितीत खरोखरच पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापित लोकांच्या जाहीर सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संबोधित करणार असून ते आठ मे रोजी जम्मू काश्मीर ला भेट देणार आहेत.

आठ मे रोजी जम्मू आणि काश्मीर पीपल्स फोरमच्या वतीने पाकव्याप्त जम्मू-काश्मीर पुन्हा भारतात विलीन करण्याच्या संकल्पासाठी POJK संकल्प रॅली आयोजित केली आहे. या अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात विलीन करण्याचा संकल्प केला जाणार असून जम्मू शहरात ही संकल्पना रॅली होणार आहे. यासाठीच्या फोरमने प्रमुख पाहुणे म्हणून अमित शहा यांना आमंत्रित केले आहे. अमित शहा यांच्या या दौऱ्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी त्यांच्या या दौऱ्याची तयारी गृहमंत्रालयाकडून सुरू आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जमुना 24 एप्रिल रोजी भेट देणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील या नियोजित दौऱ्यासाठी गृहमंत्रालयाचे अधिकारी व सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान 24 एप्रिल रोजी होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, अमरनाथ यात्रेची सुरक्षितता आणि अमित शहा यांचा संभाव्य दौरा याची आखणी केली जाणार आहे.











