मुंबई : महान्यूज लाईव्ह
काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांना नुकतीच अहमदाबाद सत्र न्यायालयाने गुजरात बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे ही परवानगी मिळताच काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्याचबरोबर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात नितीन राऊत सुनील केदार यांची त्यांनी भेट घेतली पुरोगामी विचारसरणीच्या आश्वासक नेत्यांची भेट घेतली असे या भेटीनंतर हार्दिक पटेल यांनी सांगितले.
हार्दिक पटेल यांनी दिल्लीत ही भेट दिली. त्या ठिकाणी युवक काँग्रेसच्या फळीतील कार्यकर्त्यांची आणि राष्ट्रीय सेवा दलाच्या नेत्यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. मी महाराष्ट्रातील माझ्या मित्रांना व माझ्या मार्गदर्शकांना भेटलो असेही हार्दिक पटेल यांनी सांगितले. हार्दिक पटेल म्हणाले मला खूप दीर्घकाळानंतर न्यायालयाने गुजरातच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली. मी खूप दिवसापासून महाराष्ट्रात माझ्या मित्रांना भेटलो नव्हतो. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचा मी महाराष्ट्रात जाऊन प्रचार केला होता. त्यापैकी काहीजण विजय देखील झालेले आहेत त्यामुळे त्यांना मला भेटायचे होते. त्याच बरोबर मी आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील भेटलो असे त्यांनी सांगितले.











