महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अमेरिकेने भारत, चीन, जपान आणि ब्राझील कडून घेतलेल्या कर्जामध्ये भारताच्या 15 लाख कोटी रुपयांचा समावेश आहे. अर्थात हे कर्ज मागील दोन दशकातील आहे. कोरोनाच्या काळात अमेरिका आर्थिक दृष्ट्या आणखी गर्तेत गेले असून अमेरिकेवर सध्या 29 ट्रिलियन डॉलर जागतिक कर्ज आहे.
जागतिक महासत्तेने भारताकडून कर्ज घेणे ही एक वेगळीच गोष्ट असल्याने सध्या भारताच्या 15 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची देशभरात चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांनी संसदेत ही माहिती दिली. अमेरिकेवर भारताचे 216 बिलियन डॉलर कर्ज आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 15 लाख कोटी रुपये होते. हे कर्ज मागील दोन दशकातील आहे. 2000 पासून 2020 पर्यंत कर्ज भारताने दिले आहे. 2014 नंतर हे भारताचे कर्ज पन्नास टक्क्यांनी वाढले असून, भारतावर देखील 84 लाख कोटींचे कर्ज आहे. अर्थात अमेरीकेने चीन कडून एक ट्रिलियन डॉलर चे कर्ज घेतले आहे. हे कर्ज ओबामांच्या प्रशासनापासून असल्याची माहितीदेखील जो बायडन यांनी दिली आहे.











