महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
भलेही देशांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन एका बाजूला सुरू असेल किंवा पंतप्रधानांच्या मंकी बाटला डिसलाइक जास्त येत असतील पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झालेली नाही, उलट नोव्हेंबर महिन्यात 76 लाख ट्विटर एंगेजमेंट एका महिन्यात घेत त्यांनी फर्स्ट रँकिंग कायम राखली आहे.
नरेंद्र मोदींचा भारतातील सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ट्विटरच्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अॅनालीटिक्स प्लॅटफॉर्म च्या अहवालात नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकावर आहेत. मोदी यांच्यानंतर अभिनयातून सोनू सूद, पत्रकार दीपक चौरसिया, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा, उद्योग क्षेत्रातून आनंद महिंद्रा, कुणाल कामरा, आदी दिग्गज नोव्हेंबर महिन्यात अधिक हिट्स मिळाले ट्विटर अकाउंटर आहेत.
नरेंद्र मोदी यांना फॉलो करणारा वर्ग ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर मोदींची लोकप्रियता भारतासह इतर देशातही कायम आहे, हेच यातून सिद्ध झाले आहे.











