शहरातील सीसीटीव्हीसाठी केली मदत
बारामती : महान्यूज लाईव्ह
खाजगी सावकारी वरील कारवाईमुळे चर्चेत असलेल्या बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आवाहन करताच बारामतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तत्परतेने बारामतीचे डॉक्टर धावून आले पहिली मदत त्यांनी केली आणि त्याची दखल देखील पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घेतली.
बारामतीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि डॉक्टर काल एकत्र आले. काही दिवसापूर्वी बारामतीतील गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी जर बारामतीच्या संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि संपूर्ण बारामती शहर सीसीटीव्हीच्या टप्प्यात आणले तर बारामतीतील अनेक घडणारे गुन्हे आटोक्यात येतील असे मत व्यक्त करत बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ही योजना आखली आहे ती योजना लोकसहभागातून प्रत्यक्ष साकारली जाईल असे त्यांनी सांगताच लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले आणि पहिला प्रतिसाद शहरातील डॉक्टरांनी दिला.
मेडिकोज गिल्डचे डॉ.अशोक तांबे, गिल्डचे अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे, सचिव डॉ. तुषार गदादे, सहसचिव डॉ. सुहासिनी सोनवले, खजिनदार डॉ. चंद्रकांत पिल्ले आणि आपत्कालीन व्यवस्थापन समिती चे प्रमुख डॉ. सुजीत अडसुळ यांनी निरीक्षक नामदेव शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मेडिकोज गिल्डच्या वतीने या कामासाठी सामाजिक कर्तव्य म्हणून 61 हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी मेडिकोज गिल्ड चे अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यासाठी मदत करणाऱ्या मेडिकोज गिल्डच्या सदस्यांचे शिंदे यांनी आभार मानले. सीसीटीव्ही कॅमेरे हे गुन्ह्याचा व चोरीचा छडा लावण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडतात. यासाठी ते लवकरात लवकर बसविण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांनी सांगितले.
पोलीस अक्षीक्षकांनी घेतली तातडीने नोंद
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी या गोष्टीची लगेचच नोंद घेतली. आपत्कालीन व्यवस्थापन समिती चे डॉ सुजित अडसूळ यांच्या शी संपर्क साधून मेडिकोज गिल्डच्या सर्व डॉक्टर सदस्यांचे आभार मानले.











