पुणे : महान्यूज लाईव्ह
कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला जगभरातील शंभर देशांच्या राजदूतांची नियोजित भेट रद्द झाली आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. फक्त त्यांच्या नियोजित भेटीची वेळ बदलण्यात आली आहे. अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जाणार नाहीत.
कोरोना लस निर्मितीच्या पार्श्वभूमीवर जगातील शंभर देशांच्या राजपुतांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत इन्स्टिट्यूटला होणार होती, मात्र तांत्रिक कारणास्तव ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे, तर नरेंद्र मोदी देखील या भेटीसाठी पुण्यात येणार होते. सकाळी दिल्ली येथून ते दुपारी एक वाजता सिरम इन्स्टिट्यूट मध्ये येणार होते, मात्र राजपुतांची भेट रद्द झाल्यानंतर आता मोदी दुपारी चार वाजता सिरम इन्स्टिट्यूट ला भेट देणार आहेत.
मात्र या पार्श्वभूमीवर स्थानिक ठिकाणी कोणताही स्वागत समारंभ अथवा भेटीगाठी होणार नाहीत असे पंतप्रधान कार्यालयाने कळविले असल्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परंपरेनुसार पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जाणार नाहीत. राज्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.










