महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे पुण्यामध्ये रुबी हॉल रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काल त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अगोदर कोरोनावर मात केली होती. कोरोनानंतरही त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.
साठ वर्षे वय असलेले भारत भालके मंगळवेढा पंढरपुर मतदारसंघाचे आमदार होते. नाना या नावाने ते मतदारसंघात परिचित होते. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉल मध्ये जाऊन भारत भालके यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. भालके यांच्यावर पंढरपूर जवळील सारकोली या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारत भालके सर्व पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध आणि जनतेशी असलेला जिव्हाळा यामुळे ते सुपरिचित होते.











