महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
ऑगस्ट सप्टेंबर मध्ये देशांमध्ये हाहाकार उडवलेल्या कोरूना ने जणू देशातून गाशा गुंडाळला अशा अविर्भावात असलेल्या भारतवासियांसाठी कोरोना ने पुन्हा दरवाजा ठोठावला आहे. गेल्या 24 तासात देशात नव्याने 45 हजार रुग्ण आढळले आहेत. राज्यातही पाच हजारांपर्यंत रुग्णसंख्या गेली आहे.
जगातील काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. तोच प्रकार भारतातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी आरोग्य विभागाने केली असली, तरी दिवाळीच्या गर्दीने कोरोनाला आमंत्रण दिले आहे.
भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही अशी कितीही वल्गना सरकार करत असले, तरी प्रत्यक्षात गावा-गावात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण कोरोनाची दुसरी लाट दिसत असल्याचा प्रत्यय देत आहेत. आज आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या रुग्ण संख्येनुसार देशामध्ये सध्या 4 लाख 43 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून, फक्त गेल्या चोवीस तासात देशांमध्ये 45 हजार नव्याने रुग्ण आढळले आहेत.











