महान्यूज स्पोर्टस् अपडेट
कर्णधार रोहित शर्मा च्या 68 धावांनी मुंबईने पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली. दिल्लीच्या 156 धावांचा प्रतिकार करताना मुंबईने आठ चेंडू व पाच गडी राखून दिल्लीचा पराभव केला.
आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडे अंडर करंट म्हणूनच पाहिले जात होते. काल दिल्लीची सुरुवात देखील अशाच स्वरूपात झाली. श्रेयस अय्यर पन्नास चेंडूत केलेल्या 65 धावा व ऋषभ पंत 38 चेंडू मध्ये केलेल्या 56 धावांमुळे दिल्ली मोठी धावसंख्या उभारली असे वाटत होते, मात्र ट्रेंट बोल्टच्या भेदक गोलंदाजी पुढे दिल्लीचा संघ 156 धावांवर मर्यादित राहिला. दिल्लीच्या 118 धावानंतर नियमितपणे बाकीचे फलंदाज बाद होत गेले आणि 156 धावांवर दिल्लीचा संघ सिमीत राहिला.
त्याला उत्तर देताना रोहित शर्माने 51 चेंडू मध्ये 68 धावा केल्या. यामध्ये त्याने तुफान फलंदाजी करताना चार षटकार व पाच चौकार लगावले. त्यानंतर ईशान किशन याने 19 चेंडूमध्ये 33 धावा करत मुंबईच्या संघाला कमी कालावधीत विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. कुणाल पांड्या ने शेवटी येत एक धाव घेत मुंबईचा विजय साकार केला.











