महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अभिनेता सुशांत सिंह यांच्या आत्महत्या प्रकरणात सुशांतला त्याच्या बहिणीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे दिल्याचा आरोप या चक्रवर्तीने केल्यानंतर सीबीआयने यामध्ये लक्ष घातले आहे. यामध्ये सीबीआय कडून आपल्याला अटक होऊ शकते, म्हणून या बहिणींनी न्यायालयात धाव घेतली आहे.
रिया चक्रवर्ती हिने मुंबई पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफ आय आर दाखल करताना सुशांतच्या बहिणींची नावे घेतली आहेत. त्यामुळे या एफआयआरच्या आधारे सीबीआय आपल्याला अटक करु शकते अशी सुशांतच्या बहिणींना भीती वाटत आहे. त्यामुळेच सुशांत सिंह राजपूत यांच्या बहिणी प्रियांका आणि मितू सिंह यांनी या प्रकरणाची सुनावणी लवकर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.










