इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज 36 जणांची तपासणी झाली यामध्ये 13 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भिगवण येथील 42 वर्षीय पुरुष, रुई येथील 72 वर्षीय पुरुष, इंदापूर येथील 28 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.
वालचंदनगर येथील 55 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 25 वर्षीय महिला, सरडेवाडी येथील 45 वर्षीय महिला, दोन वर्षीय मुलगी, बाभुळगाव येथील 50 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.











