बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे त्यांच्या पुढाकारातून प्रदीप धापटे मित्र परिवाराच्या वतीने ऊसतोड मजुरांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.
प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराच्या वतीने गेली अठरा ते वीस वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. आठ दिवसापूर्वी विजयादशमीच्या मुहूर्तावर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला असून कोऱ्हाळे बुद्रुक परिसरात अनेक ऊसतोड मजूर बीड, नगर जिल्ह्यातून दाखल झाले आहेत.
प्रदीप धापटे यांच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांना व त्यांच्या मुलांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांचे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे तसेच ऊस तोड करताना संपूर्ण अंगभर कपडे घालता यावे हाच यामागचा उद्देश असल्याचे मत या कार्यक्रमावेळी उपसभापती प्रदीप बापू धापटे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमोद पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. आशा प्रकल्पाचे तुषार जाधव व अजित खोमणे यांनीही अशा प्रकल्पाविषयी ऊसतोड मजुरांना माहिती देत मुलांना शाळेत पाठवण्याचं आवाहन केले. ऊसतोड मुकादम अनिल राणे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी रामदास धापटे (सर), धनंजय पडवळ, संभाजी जाधव, दत्ता नलवडे,विनोद गाडे, सागर गाडेकर,अशोक कदम, बन्सी पानसरे, साहिल शिरसागर, योगेश साळुंखे, लखन कोंढाळकर, यांच्यासह इतर उपस्थित होते.











