इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील पोलीस दलातील ग्रामीण पोलीस शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्या पुढील प्रमाणे.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रयोग मुजावर यांची जिल्हा वाहतूक शाखेत बदली झाली आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांची जिल्हा विशेष शाखेत, तर पोलीस निरीक्षक सदाशिव गोविंद शेलार यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यातून हवेली पोलीस ठाणे मध्ये बदली झाली आहे.
राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांची राजगड येथेच नियुक्त्ती नियमित करण्यात आली असून तशीच नियुक्ती खेड पोलिस ठाण्याचे सतीश कुमार गुरव, कामशेत पोलीस ठाण्याचे अरविंद चौधरी, आर्थिक गुन्हे शाखेचे विठ्ठल दबडे यांची नियुक्ती नियमित करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नामदेवराव गणपतराव शिंदे यांची मुंबई शहर येथून बारामती शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे, तर अहमदनगर येथे काम करणारे दिलीप शिशुपाल पवार यांची लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांची घोडेगाव पोलीस ठाण्यात, तर दौंड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची बारामती तालुका पोलीस ठाण्यात, इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित जाधव यांची दौंड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
जुन्नर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मिलिंद साबळे यांची खेड पोलिस ठाण्यात, तर खेड पोलिस ठाण्याचे निलेश बडाख यांची जुन्नर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे फौजदार पद्मराज गंपले यांची यवत पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, दौंड पोलीस ठाण्याचे प्रकाश खरात यांची लोणी काळभोर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
दौंड पोलीस ठाण्यातील फौजदार तेजस मोहिते यांची इंदापूर पोलीस ठाण्यात तर इंदापूर पोलीस ठाण्याचे फौजदार सुशील लोंढे यांची दौंड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. बारामतीचे वाचक फौजदार संदीप गोसावी यांची लोणावळा शहर पोलीस ठाणे वालचंद वरचे फौजदार संजय कुमार धोत्रे यांची इंदापूर पोलीस ठाणे वालचंद नगर ते फौजदार सदाशिव जगताप यांचे बारामती शहर पोलिसांनी तर यवत पोलीस ठाण्यातील फौजदार नितीन लकडे यांची वालचंदनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.











