बारामती: महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रभाव जैसे थे आहे. तपासण्यांच्या तुलनेत आढळणारे कोरोनाग्रस्त अधिक असल्याने बारामतीकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची दिवसाकाठी आढळणारी संख्या पाच वरून थेट साठ पर्यंत वाढली. त्यामुळे बारामती तालुक्यात रस्त्यावर व बाजारपेठेत होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण ठरणार नाही, याची काळजी घेऊन सोशल डिस्टंसिंग व स्वच्छतेचे नियम पाहण्याची गरज आहे
बारामती तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये डोर्लेवाडी येथील 45 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 45 वर्षीय महिला, शारदानगर येथील 65 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 40 वर्षीय महिला, शिरवली येथील 18 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 20 वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील 30 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सिद्धार्थनगर येथील 48 वर्षीय महिला, 75 वर्षीय महिला, 51 वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील 90 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 48 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगी, मेडद येथील 23 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 50 वर्षीय महिला, बर्हाणपूर येथील 27 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पण तरीही येथील 61 वर्षीय महिला व 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे











