इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांत कोरोनाची तपासणी कमी होत असल्यानेच कोरोनाचे रुग्ण कमी दिसत असल्याचा जो अंदाज होता, तोच खरा झाला आहे. कारण इंदापूर तालुक्यात आज १४२ जणांची आरटीपीसीआर व अॅंटिजेन चाचणी झाली, त्यात तब्बल ४० टक्क्यांवर म्हणजे ६० रुग्ण आढळून आले आहेत. तर शेळगाव, बावडा व निरवांगी येथील तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
इंदापूर तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये आज सणसर येथील ३३ वर्षीय महिला, लासुर्णे येथील ६६ वर्षीय पुरूष, लाकडी येथील ३६ वर्षीय पुरूष, शेळगाव येथील ६५ वर्षीय पुरूष, बोरी येथील ८५ वर्षीय पुरूष, बेलवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, चिखली येथील ५० वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष व १३ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
वालचंदनगर येथील ३८ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ३९ वर्षीय पुरूष, घोलपवाडी येथील १९ वर्षीय मुलगा, भिगवण येथील ३० वर्षीय पुरूष, जंक्शन येथील २८ वर्षीय पुरूष, नमगाव केतकी येथील ७१ वर्षीय महिला, निरवांगी येथील ८५ वर्षीय महिला, वडापुरी येथील ३४ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
सरडेवाडी येथील ४० वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरूष, १९ वर्षीय महिला, इंदापूर येथील ४० वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगी, ५० वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय महिला, न्हावी येथील ४८ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महिला, ८० वर्षीय पुरूष, लोणीदेवकर येथील २२ वर्षीय युवक,, २३ वर्षीय युवक, २० वर्षीय युवक, २७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
टेंभूर्णी येथील ३५ वर्षीय पुरूष, कालठण नंबर २ येथील ५० वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ४० वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महिला, ७५ वर्षीय पुरूष, कालठण नंबर २ येथील ८० वर्षीय पुरूष, बावडा येथील ४५ वर्षीय महिला, वडापुरी येथील २६ वर्षीय महिला, ७ वर्षीय मुलगी, ६ वर्षीय मुलगा, ६ वर्षीय मुलाचा समावेश आहे.
पळसदेव येथील २० वर्षीय युवक, कालठण नंबर २ येथील १६ वर्षीय युवक, २० वर्षीय महिला, शेळगाव येथील ६२ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, ४ वर्षीय मुलगा, २५ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय महिला, २ वर्षीय मुलगी, इंदापूर येथील २५ वर्षीय पुरूष, ४९ वर्षीय पुरूष, तक्रारवाडी येथील ३६ वर्षीय पुरूष, बिल्ट कंपनी येथील ४४ वर्षीय पुरूष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.










