महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
पहिली चाचणी कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर अजित दादा क्वारंटाइन झाले होते, ते देवगिरी निवासस्थानातूनच कारभार पाहत होते, परंतु आज त्यांची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना उपचारासाठी ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून उपमुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या ट्विटनुसार अजित पवार यांनी म्हटले आहे की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्यातील नुकसान पाण्हणी दौऱ्यानंतर थोडासा ताप आणि अंगात कणकणी असल्याने अजित पवार हे स्वतःहून क्वारंटाईन झाले होते. त्यावेळी काही प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा शोध लावला होता, परंतु अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी त्याचे खंडन करीत अजितदादांची चाचणी निगेटीव्ह असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र आता खरोखरच कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः अजित पवार यांनी त्याची माहिती दिली आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीची चौकशी संदर्भात राज्यभरातून फोन येत असल्याने अजित पवार यांनी स्वतः ट्विट करत थोड्या विश्रांती नंतर मी पुन्हा कार्यरत होईल असा संदेश दिला आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.










