इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात काल दसरा असूनही कोरोनाच्या चाचण्या सुरूच राहिल्या. यामध्ये 17 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. बारामती तालुक्यात मात्र फक्त चार रुग्ण काल कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल इंदापूर तालुक्यात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर शहरातील 80 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
इंदापुरातील मंगल लॅबरोटरी च्या शाखेत तपासलेल्या rt-pcr तपासणीत लासुर्णे येथील 65 वर्षीय पुरुष कळंब येथील 43 वर्षीय पुरुष लोणी देवकर येथील चाळीस वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत
इंदापूरच्या ग्रामीण भागात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निमगाव केतकी येथील 31 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, कालठण नंबर 2 येथील 55 वर्षीय पुरुष, तीन वर्षीय मुलगा, 28 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, रेडणी येथील 70 वर्षीय पुरुष व वालचंदनगर येथील 35 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामती तालुक्यात फक्त चार जण कोरोना बाधित
बारामती तालुक्यातील शासकीय रॅपीड अंन्टिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मेखळी येथील 65 वर्षीय पुरुष, बारामतीतील 32 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आठवण आले आहेत
बारामती तालुक्यातील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड तपासणीत माळेगाव येथील शिवनगर सहकारी साखर कारखाना स्थळावरील 53 वर्षीय महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तामध्ये बारामतीतील जगताप वस्ती येथील साठ वर्षीय पुरुष रूग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे.










