इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगामाची सुरुवात दोनदा होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आता सुटला असून सकाळी नऊ व अकरा वाजता ऐवजी दहा वाजता मुळे पूजन होणार आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व ऊस उत्पादक सभासद, संचालक मंडळाच्या उपस्थित हे मोळीपूजन होणार आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होत असून अगोदर हा कार्यक्रम नऊ अकरा वाजता ठेवला होता परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वेळेनुसार नऊ वाजता करण्याचे ठरले होते, तर अगोदर ठरल्यानुसार अकरा वाजता कार्यक्रम करण्याचा मनोदय कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व ऊस उत्पादक सभासद सहकाऱ्यांनी जाहीर केला होता.
त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र छत्रपती कारखान्याची प्रगती व समृद्ध करण्याच्या दृष्टीने सर्वजण एकत्र आले असून यावरती कोणतीही परिस्थिती ही तणावाची होऊ द्यायची नाही अशा स्वरूपाची मध्यस्थी करण्यात आली.
दोन्ही बाजूकडून संपर्क होऊन सकाळी दहा वाजता एकत्रित मुळी पूजनाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी दहा वाजता छत्रपती कारखान्याचे मोळीपूजन होणार आहे.











