इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या 20 25 च्या दरम्यान टिकून आहे, काल देखील 64 जणांची तपासणी झाली, यामध्ये 19 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
इंदापूर तालुक्यात काल आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वालचंदनगर येथील 52 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, निमगाव केतकी येथील 28 वर्षीय पुरुष, खोरोची येथील 52 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
बेलवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 42 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 65 वर्षीय महिला, 22 वर्षीय महिला, बारा वर्षीय मुलगा, 1 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
न्हावी येथील 35 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, भिगवण येथील 34 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.











