• Contact us
  • About us
Tuesday, October 20, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उध्दवजी विचार नंतर करा.. आधी नुकसानभरपाई द्या..

Maha News Live by Maha News Live
October 22, 2020
in संपादकीय, सामाजिक, शेती शिवार, महिला विश्व, आरोग्य, राजकीय, राज्य, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0

संपादकीय

मागील आठवड्यातील बुधवारची रात्र संपूर्ण राज्यातच शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरली. गावागावात ओढ्याकाठच्या जमीनी पावसाने खरव़डून नेल्या. उभे पिक तर नेलेच, पण काळी मातीही नेल्याने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. त्यांना टिचूकभर नुकसान भरपाई जखमेवर मीठ चोळणारी ठरेल. म्हणूनच उध्दवजी हे लोककल्याणकारी राज्य असेल, तर अगोदर नुकसान भरपाई तुम्ही विरोधी मते व्यक्त करताना जशी मागत होता, तशी आता द्यायला हवी. राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित नाही, मात्र शेतकरीही आता उभारीला येणार नाही याची जाणीव ठेवून नुकसान भरपाई जाहीर करा.

मुळात नुकसान होऊन आठ दिवस झाले, तरी संपूर्ण भागातील पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. सरकारी यंत्रणेला घरात पाणी शिरलेल्यांचे नुकसान दिसते, उभा शेतकरी आडवा झाल्याचे गांभिर्य का नाही याचे आश्चर्य वाटते.

अशी आपत्ती आली तर काय करावे याचे नियम सन २०१५ मध्येच शासनाने घालून दिले आहेत. राज्य शासनाने १३ मे २०१५ रोजी नुकसान भरपाई कशी असावी याचे निर्देश दिले आहेत. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महागाई निर्देशांक वाढलेला आहे, त्याचा विचार करता या नुकसान भरपाईपेक्षा कितीतरी अधिक नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. मात्र अगदी तातडीची मदत म्हणून १३ मे २०१५ रोजीचा तुमच्याच सरकारने काढलेला अध्यादेश पाहावा.

या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, आपत्तीत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना ४ लाख रुपये, अवयव अथवा डोळे निकामी झाल्यासही भरपाई असून ४० ते ६० टक्के अपंगत्व असेल तर ५९ हजार १०० रुपये, ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असेल तर २ लाख रुपये, एका आठवड्यापेक्षा अधिक काळ दवाखान्यात दाखल झाल्या, १२ हजार ७०० रुपये, एका आठवड्यापेक्षा कमी काळ असेल तर ४ हजार ३०० रुपये, नैसर्गिक आपत्तीत पाण्यात घर बुडाले, वाहून गेले असेल तर कपडे, भांडी, घरगुती वस्तूंसाठी प्रतिकुटुंब कपड्यांकरीता १८०० रुपये, भांडी, वस्तूंसाठी २ हजार रुपये भरपाई द्यावी असे नियम आहेत.
आपत्तीत घर सोडावे लागले व तात्पुरता आसरा असलेल्या ठिकाणी लोक राहायला गेले नसतील, तर प्रतिप्रौढ व्यक्तीस ६० रुपये व लहान मुलांना ४५ रुपये प्रतिदिन मदत द्यायची आहे.


शेतजमीनीसाठी देखील नुकसान भरपाईचे निकष आहेत. २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना शेतजमीनीवर वाळूचा, गाळाचा थर तीन इंचापेक्षा जास्त जमा झाला असेल, मातीचा ढिगारा असेल, तर १२ हजार २०० रुपये प्रतिहेक्टरी मदत द्यावी असे आदेश आहेत. शेतजमीन वाहून गेली असेल तर प्रतिहेक्टरी ३७ हजार ५०० रुपये मदत द्यायची आहे. शेतातील फळपिके, पिके वाहून गेली असतील तर कोरडवाहू क्षेत्रासाठी ६ हजार ८०० रुपये व बागायती भागासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी मदत करायची आहे. बहुवार्षिक पिके म्हणजे बागा वाहून गेल्या असतील तर प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये, मात्र कमीत कमी २ हजार रुपयांपेक्षा कमी मदत देता कामा नये असे स्पष्ट निर्देश आहेत.


ज्यांची जनावरे या आपत्तीत दगावली, त्यांना दुधाळ म्हैस, गायीसाठी ३० हजार रुपये, बैल घोड्यासाठी २५ हजार रुपये, मेंढी, बकरी, डुक्करांसाठी ३ हजार रुपये, वासरू, गाढव, शिंगरूसाठी १६ हजार रुपये, कोंबड्या मेल्या असतील तर प्रतिकोंबडी ५० रुपये आणि एका कुटुंबासाठी कमाल ५ हजार रुपये असे नुकसानभरपाईचे निकष आहेत.

ज्यांची पूर्ण घरेच वाहून गेली आहेत, अशांना पक्की घरे असतील तर ९५ हजार रुपये, झोपडी असेल तर ४ हजार १०० रुपये, घराला गोठा लागून असेल तर २१०० रुपये गोठ्यासाठी, कच्च्या घरांसाठी जिथे १५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असेल तर तिथे ३२०० रुपये नुकसान भरपाई देण्याचे निकष आहेत.

त्यामुळे किमान हे निकष तरी पाळावेत, तातडीने त्यातून मदत करावी. सन २०१५ मधील स्थिती व २०२० मधील खर्चाची स्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्याच्या कोंबड्या मेल्या आहेत, त्यांना ५० रुपयांनी काय होणार आहे? हा प्रश्न आहेच, मात्र सरकार तारण्यासाठी असते, दिलासा देण्यासाठी असते, हे चित्र दिसले पाहिजे. जनमाणसात ते उठून दिसले पाहिजे.

आता ही नुकसान भरपाई मागण्यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये मतभेद होणार आहेत, यावरून राजकीय वादळही उठणार आहे, मात्र तरीदेखील सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. ज्यांना राजकारण करायचे, त्यांना करू द्यावे, सरकारने लोककल्याणकारी व लोकहिताची आपली भूमिका प्रत्यक्षात दाखवली पाहिजे.

ज्यांच्या शेतजमीनी खरवडून गेल्या आहेत. त्यांचे दुःख तर नुकसान भरपाईत मोजताच येणार नाही. मात्र त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत हे सरकारने दाखवून दिले पाहिजे, त्या बळीराजाच्या जगण्याच्या लढाईला आपले योग्य पाठबळ उभे केले पाहिजे. आज त्याचीच गरज आहे. बाकी कोणी दौरे केले, किती केले, कोण किती किलोमीटर दौरा केला, यात कोणाही शेतकऱ्याला रस नाही. दिवाळी तोंडावर आहे, त्यापूर्वीच निघालेल्या दिवाळ्याला दिलासादायक भरपाईचा लाडू शेतकरी, कष्टकऱ्यांच्या तोंडात सरकारने घालावा हीच अपेक्षा.

Tags: CM Uddhav ThackerayCMO MaharashtraDCM Ajit PawarGOVT OF MAHARASHTRA
Next Post
ऐ तोंडावर मास्क घेऊन बोल… अजित पवार बोलले आणि ..

अजित दादा क्वारंटाईन; निकटवर्तीयांनी दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group