• Contact us
  • About us
Tuesday, November 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामती भूलतज्ज्ञ संघटनेच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ISA चा ‘बेस्ट सिटी ब्रँच’ आणि ‘पब्लिक अवेअरनेस’ पुरस्कार जाहीर!

mahaanewslive by mahaanewslive
November 23, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामती भूलतज्ज्ञ संघटनेच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ISA चा ‘बेस्ट सिटी ब्रँच’ आणि ‘पब्लिक अवेअरनेस’ पुरस्कार जाहीर!

बारामती, दि. २३  : इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेशिऑलॉजिस्ट्स (ISA) च्या बारामती शाखेने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत २०२६ चे दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ISA चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नवीन जी. मल्होत्रा यांनी दिल्ली येथे आज या पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली.

​ISA National तर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये बारामती भूलतज्ज्ञ संघटनेला ‘बेस्ट सिटी ब्रँच – स्मॉल कॅटेगरी’ (Best City Branch – Small Category) या विभागातील राष्ट्रीय पुरस्काराने, तर सार्वजनिक जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘पब्लिक अवेअरनेस अवॉर्ड – स्पेशल कन्सोलेशन प्राईज’ (Public Awareness Award – Special Consolation Prize) देऊन गौरविण्यात आले आहे.

​बारामती शाखेने गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक आरोग्य जनजागृती, सीपीआर (CPR – जीवनसंजीवनी प्रक्रिया) प्रशिक्षण, रुग्णसुरक्षा आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शाखेच्या या सातत्यपूर्ण आणि सामूहिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

या यशामध्ये महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश तगडपल्ले, उपाध्यक्ष डॉ. दिलीप देसाई, सचिव डॉ. शीतल दलाल, तसेच डॉ. सौरभ बर्डे, डॉ. सचिन चांदोलकर, डॉ. अविनाश भोसले आणि डॉ. शिल्पा तिवसकर यांच्यासह राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या देदीप्यमान यशाबद्दल राज्य पदाधिकाऱ्यांसह बारामतीतील वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातून बारामती शाखेचे विशेष अभिनंदन होत आहे.

डॉ. अशोक तांबे (ज्येष्ठ भूलतज्ज्ञ व प्रमुख मार्गदर्शक): “बारामती शाखेचे सर्व सदस्य जनजागृती आणि जीवनसंजीवनी प्रशिक्षणाचे कार्य अत्यंत उत्तमरीत्या करत आहेत. समाजातील कोणत्याही घटकाला असे प्रशिक्षण हवे असल्यास आमचे सदस्य त्यासाठी निश्चितच मदत करतील. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी आमचे सदस्य समाजासाठी सदैव तत्पर असतील.”

डॉ. सुजित अडसुळ (गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, SAMS): “हे दोन्ही पुरस्कार आमच्या संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे यश आहे. बारामती भूलतज्ज्ञ संघटना जीवनसंजीवनी प्रक्रियेचे प्रशिक्षण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. या यशामागे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. संजीव कोल्हटकर आणि डॉ. अशोक तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.”

डॉ. दादासाहेब वायसे (अध्यक्ष) व डॉ. निकिता मेहता (सचिव), ISA बारामती शाखा: “या पुरस्कारांमुळे आमच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, भविष्यातही अधिक जोमाने सार्वजनिक जनजागृती व सामाजिक आरोग्यसेवेचे उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group