• Contact us
  • About us
Tuesday, November 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सांगलीत सहा स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर; आता पुणे जिल्हा परिषदेतील सात जागांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी!

mahaanewslive by mahaanewslive
November 23, 2026
in यशोगाथा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पुणे, Featured
0
सांगलीत सहा स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर; आता पुणे जिल्हा परिषदेतील सात जागांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी!

पुणे : महान्यूज लाईव्ह

जिल्हा परिषदांच्या राजकारणात स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय आता चांगलाच चर्चेत आला आहे. सांगली जिल्हा परिषदेत सहा स्वीकृत सदस्यांची निवड झाल्याने तेथील नियुक्ती प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला आहे. सांगलीतील निवडी जाहीर झाल्यानंतर आता पुणे जिल्हा परिषदेतील सात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सांगलीत पक्षीय संख्याबळानुसार विविध पक्षांना प्रतिनिधित्व मिळाले असून पुण्यातही अशाच प्रकारे राजकीय गणित जुळवले जाणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्य नियुक्त होणार असून संभाव्य पक्षीय गणितानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाच, भाजपला एक आणि दोन्ही मिळून शिवसेनेला एक जागा मिळणार आहे. त्यामुळे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगलीत सहा जणांची निवड; पक्षनिहाय प्रतिनिधित्व निश्चित..

सांगली जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यपदासाठी सहा जागांवर सहाच अर्ज दाखल झाल्याने सहा सदस्यांची निवड झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष घनवट आणि सतीश पवार, काँग्रेसचे विठ्ठल साळुंखे, भाजपच्या धनश्री लाड, शिवसेना शिंदे गटाच्या ॲड. विद्या मोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन देशमुख यांचा समावेश आहे. सांगलीतील या निवडीमुळे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून आता पुणे जिल्हा परिषदेतील नियुक्ती प्रक्रिया कधी पूर्ण होणार याकडे राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या पाच जागांवर सर्वाधिक चुरस..

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७३ पैकी ५१ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या सात जागांपैकी पाच जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अनुभवी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा विचार होऊ शकतो. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील संघटनात्मक योगदान, स्थानिक पातळीवरील काम, सामाजिक प्रतिनिधित्व आणि तालुकानिहाय समतोल साधताना पक्षनेतृत्वाची कसोटी लागणार आहे. निवडणुकीत संधी न मिळालेले किंवा निवडणुकीच्या राजकारणात मागे राहिलेले काही अनुभवी कार्यकर्तेही या प्रक्रियेकडे आशेने पाहत आहेत.

भाजप आणि शिवसेनेच्या जागांवरही उत्सुकता..

संभाव्य राजकीय गणितानुसार भाजप आणि दोन्ही शिवसेनेला मिळून प्रत्येकी एक जागा मिळण्याची चर्चा आहे. या जागांसाठी संबंधित पक्षांकडून कोणत्या अनुभवी कार्यकर्त्यांना संधी दिली जाते याकडेही लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे जिल्ह्यातील राजकीय संख्याबळ आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्नही या प्रक्रियेत महत्त्वाचा ठरू शकतो.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group