बारामती : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, पुणे जिल्ह्यातील ६६१ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील ४१ जणांचा समावेश असून, महाराष्ट्र शासनाच्या १२ ते १८ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पुणे विभागीय राजपत्रात या नियुक्त्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध झाली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शासनाच्या अधिकारांचा वापर करून या नियुक्त्या केल्या आहेत.
राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी सध्या मोठी चुरस पाहायला मिळत होती. महायुती सरकारने नव्या नियमावलीसह या नियुक्त्या पुन्हा सुरू केल्या असून, प्रत्येक ५०० मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचे धोरण निश्चित केले आहे. या निर्णयानुसार राज्यभरात सुमारे १ लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पुणे विभागीय राजपत्रातील अनुसूचीमध्ये बारामती तालुक्यातील नियुक्त व्यक्तींची नावे अनुक्रमांक ४४१ ते ४८१ दरम्यान नोंदविण्यात आली आहेत.
नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून मोठी जबाबदारी असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना शासकीय कामांसाठी आवश्यकतेनुसार ओळख व रहिवासाचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद त्यांना आहे. याशिवाय आपले सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र आणि आधार केंद्रांवरील कागदपत्रांच्या कामांसाठी नागरिकांना सहकार्य करणे, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे, तसेच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, कृषी आणि पशुसंवर्धन यांसारख्या विषयांवर नागरिकांना मदत करणे, अशी कामे त्यांना करावी लागणार आहेत.
दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाला मदत करणे, पंचनामे व बचावकार्यात सहकार्य करणे, गावातील शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस विभागाला मदत करणे, तसेच निवडणूक प्रक्रिया, जनगणना आणि विविध शासकीय सर्वेक्षणांमध्ये संबंधित यंत्रणेला सहकार्य करणे, या जबाबदाऱ्याही त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण ६६१ नियुक्त्यांमध्ये बारामती तालुक्यातील ४१ व्यक्तींना संधी मिळाली आहे. यामध्ये काळखैरे संदीप प्रभाकर (पानसरेवाडी), प्रकाश तुकाराम लोणकर (शेरेवाडी), हनुमंत महादेव पिंगळे (शिरष्णे), लालभाई मकबुल शेख (आंबी खुर्द), संतोष मोहन सोनावणे (सि. निंबोडी), अभिजीत माणिकराव बिचकुले (झारगडवाडी), वैभव दिलीप घोरपडे (कांबळेश्वर), दिनेश माणिक भोसले (मूर्टी), तेजस भाऊसो लोणकर (काऱ्हाटी), नवनाथ दशरथ जाधव (माळवाडी-लोणी), सचिन अशोक जगताप (मुरूम), शफिक मेहबुब बागवान (सुपे), लक्ष्मण पोपटराव पोमणे (बाबुर्डी),
सुनील लक्ष्मण मासाळ (मासाळवाडी), भाऊसाहेब गणपत केसकर (पळशी), अजित जनार्दन सोनावणे (मुरूम), रणजीत चंद्रशेखर जगताप (भिकोबानगर, धुमाळवाडी, पणदरे), संजय शामराव टकले (ढेकळवाडी), श्रीकांत शिवाजी देवकाते (सोनगाव), सुनील मल्हारी जाधव (शिवनगर), विजय आनंदराव गोंडे (माळेगाव बुद्रुक), नवनाथ नारायण भोसले (वाणेवाडी), सुखदेव पोपट शिंदे (चौधरवाडी, करंजे), तुषार सुरेश गाढवे (आंबी खुर्द), आनंद मुरलीधर भोसले (जोगवडी), दत्तात्रय गंगाराम माळशिकारे (कोऱ्हाळे बुद्रुक), प्रणव चंद्रकांत तावरे (माळेगाव बुद्रुक),
विजय मंगल महादेव गावडे (गुणवडी), पुरुषोत्तम शिवाजी गाढवे (आंबी खुर्द), विकास हनुमंत माने (सोनगाव), योगेश सर्जेराव बनसोडे (मळद), साहेबराव तुकाराम तरटे (पानसरेवाडी, सुपे), हनुमंत तात्याराम भंडलकर (मुरूम), जब्बार रफीक इनामदार (मुरूम), युवराज सदाशिव खोमणे (मुरूम), शेखर महादेव कदम (मुरूम), संभाजी नारायण काकडे (निंबुत), संतोष संपत चौधरी (तरडोली), किरण दादासो काळे (पणदरे), सुनील बापुराव झारगड (सोनगाव) आणि प्रमोद दत्तात्रय गावडे (कऱ्हावागज) यांचा समावेश आहे. या नियुक्त्यांमुळे बारामती तालुक्यातील गावपातळीवर शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, प्रशासनाला स्थानिक प्रश्नांमध्ये सहकार्य करणे आणि नागरिक व शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधणे यासाठी एक सक्षम यंत्रणा उपलब्ध होणार आहे.










