इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी छगनराव भोंगळे यांची निवड करण्यात आली.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची नुकतीच निवड झाली. या निवडणुकीत 21 जागांसाठी 21 उमेदवारांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. सध्या हा कारखाना सहयोगी तत्वावर ओंकार शुगर्स या बाबुराव बोत्रे यांच्या समूहाकडे भाडेतत्त्वावर चालवण्यास आहे. आज नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी सर्वांना होते हर्षवर्धन पाटील यांचे नाव सुचविण्यात आले तर उपाध्यक्षपदी छगनराव भोंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली.










