• Contact us
  • About us
Tuesday, November 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांच्या पावलांची आता मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही उणीव भासत असेल…: बारामतीतील ‘नांदी’ संमेलनात प्रवीण तरडे भावुक!

mahaanewslive by mahaanewslive
November 2, 2026
in यशोगाथा, सामाजिक, मनोरंजन, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अजितदादांच्या पावलांची आता मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही उणीव भासत असेल…: बारामतीतील ‘नांदी’ संमेलनात प्रवीण तरडे भावुक!

‘जगाला हेवा वाटेल असा ‘अजितदादां’वर चित्रपट बनवण्याचा निर्धार!

बारामती : इतक्या मोठ्या आणि बेशिस्त देशामध्ये पहाटे सहा वाजता उठून कामाला भिडणारा असा लोकनेता केवळ महाराष्ट्रानेच पाहिला… आज मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही दादांची आठवण येत असेल. पहाटे सहा वाजताच धावणाऱ्या आमच्या नेत्याची पावले आता आम्हाला लागत नाहीत, अशी हळहळ मंत्रालयाच्या त्या निष्प्राण पायऱ्याही व्यक्त करत असतील… सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या या शब्दांनी बारामतीतील सभागृह स्तब्ध झाले आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. स्व. अजितदादा पवार यांच्या अद्वितीय कार्यसमर्पणाला आणि शिस्तीला साद घालत, जगाला हेवा वाटेल असा अजितदादांच्या जीवनावरील चित्रपट मी नक्की तयार करणार, असा ठाम आणि भावूक निर्धार प्रवीण तरडे यांनी येथे व्यक्त केला.

पुणे येथे जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ‘नांदी’ म्हणून बारामतीमध्ये एकांकिका साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शारदानगर येथील डॉ. आप्पासाहेब पवार सभागृहात आयोजित प्रकट मुलाखतीत तरडे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद (बारामती शाखा), नटराज नाट्य कला मंडळ आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, व नटराजचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या संकल्पनेतून दर महिन्याच्या २८ तारखेला स्व. अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचा हा एक भाग होता.

​परखड शब्दांमागील संवेदनशील मन आणि अफाट लोकसंग्रह

अजितदादांच्या कार्यपद्धतीविषयीच्या हळव्या आठवणींना उजाळा देताना प्रवीण तरडे म्हणाले, दादांचे व्यक्तिमत्त्व हा केवळ राजकारणाचा विषय नसून तो एका भव्य चित्रपटाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसे त्यांच्याकडे आशेने यायची. दादांच्या टेबलावर फायली कधीच धूळ खात पडून राहिल्या नाहीत. काम होणार असेल तर क्षणाचाही विलंब न लावता ते मार्गी लागायचे; आणि होणार नसेल तर ते संबंधित माणसाला जागेवरच स्पष्ट सांगितले जायचे. सामान्य माणसाचा वेळ, पैसा आणि श्रम विनाकारण वाया जाऊ नये, याची एवढी संवेदनशील काळजी घेणारा दुसरा नेता शोधून सापडणार नाही.

​महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांची नसन्‌नस माहिती असणारा, माणसाची अडचण नजरेतून ओळखणारा आणि परखड शब्दांमागे मायेचा ओलावा जपणारा हा नेता कसा होता, हे रुपेरी पडद्यावरून जगासमोर आलेच पाहिजे, अशी कृतज्ञ भावना त्यांनी मांडली. अजितदादा हयात असताना त्यांच्याशी या चित्रपटाबाबत सविस्तर बोलणे झाले होते, अशी आठवण सांगताना आता त्यांच्या आठवणींच्या बळावर या चित्रपटाची पूर्वतयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम दादांच्या मातोश्रींचे दर्शन घेतल्याचे सांगताना तरडे यांच्या आवाजातील आदर आणि जिव्हाळा स्पष्ट जाणवत होता.

आम्हा कलाकारांसाठी बारामती म्हणजेच किरण गुजर!

आपल्या कलाप्रवासाची मुळे उलगडताना तरडे म्हणाले, सुमारे ३० वर्षांपूर्वी मी माझ्या आयुष्यातील पहिली एकांकिका याच बारामतीतील ‘नटराज करंडक’ स्पर्धेत सादर केली होती. नटराज करंडक जिंकणे हे आमचे स्वप्न असायचे. राज काझी आणि योगेश सोमण या दिग्गजांना पाहून आम्ही शिकलो आणि घडलो. आज कोणत्याही कलाकाराला बारामतीत पाय ठेवताना कसलीही चिंता वाटत नाही; कारण आम्हा कलाकारांसाठी बारामती म्हणजेच किरणदादा गुजर आहेत! शेतकरी कुटुंबातील वारकरी संस्कार, पारायणे, कुस्तीची परंपरा आणि वाचनाची आवड यामुळेच मातीशी घट्ट जोडले गेलो, असे सांगत यश मिळाल्यानंतरही जुने मित्र, शेती आणि आपुलकीचे नाते टिकवून ठेवणे हीच खरी श्रीमंती असल्याचे त्यांनी नमूद केले.

​संमेलनात रंगली वैचारिक व नाट्यमय ‘नांदी’

​या संमेलनाचा प्रारंभ सकाळी विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात दादांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाला. उद्घाटक ॲड. ए. व्ही. प्रभुणे, ज्येष्ठ नाट्यकर्मी योगेश सोमण, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. नीलिमाताई गुजर, डॉ. राजीव शाह आणि किरण गुजर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी ‘वामन आख्यान’ ही एकांकिका सादर केली.

शारदानगर येथील सत्रात प्राचार्य रा. बा. देशमुख यांनी बारामतीच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत दादांचे विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. स्वागताध्यक्ष ॲड. प्रिया गुजर महाडिक यांनी एकांकिकेच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला, तर संमेलनाध्यक्ष राज काझी यांनी भाषेच्या समृद्धीसाठी वाचनाचा आग्रह धरला. याप्रसंगी ‘रंग जगण्याचा’ ही एकांकिका सादर झाली. द्वितीय सत्रात योगेश सोमण, राज काझी आणि श्रीष देशपांडे यांच्या परिसंवादाने रंगभूमीचे अंतरंग उलगडले; या सत्रास ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी उपस्थित राहून कलाकारांना बळ दिले.

​तिसऱ्या सत्रात ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते प्रवीण तरडे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अमरेंद्र महाडिक यांनी केले. सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी आणि रसिकांच्या साक्षीने पार पडलेल्या या संमेलनात अजितदादांच्या दातृत्वाचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा गंध दरवळत राहिला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group