• Contact us
  • About us
Monday, October 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वालचंदनगर परिसरातील सराईत गुन्हेगार अंबादास पवारवर ‘एमपीडीए’ कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

mahaanewslive by mahaanewslive
October 17, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
वालचंदनगर परिसरातील सराईत गुन्हेगार अंबादास पवारवर ‘एमपीडीए’ कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

काका यादव, वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या व सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या अंबादास तायप्पा पवार (वय ३८, रा. चिखली, ता. इंदापूर, जि. पुणे) या सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यास ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

​पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील जामिनावर सुटलेले आणि पुन्हा गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी आणि बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ (MPDA) अन्वये कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

​या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी चिखली येथील सराईत गुन्हेगार अंबादास पवार याच्या गुन्हेगारी कृत्यांचा आढावा घेतला. पवार याच्यावर २०११, २०१४, २०१६, २०२४ आणि २०२६ या वर्षांत दरोड्याची पूर्वतयारी, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, सरकारी कामात अडथळा आणून मारहाण करणे अशा गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत.

​त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी तयार केलेला एमपीडीए स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्यामार्फत पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अंबादास पवार याच्या स्थानबद्धतेचा आदेश जारी केला.

​या आदेशानंतर वालचंदनगर पोलिसांनी विविध पथके तयार करून शोध घेत १५ ऑक्टोबर २०२६ रोजी अंबादास पवार याला ताब्यात घेतले आणि त्याची मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी केली.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम (बारामती उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, वालचंदनगरचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, रामदास बाबर, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, कीर्तिलाल गायकवाड, गणेश झरेकर, गणेश काटकर, विकास निर्मळ, तसेच पोलीस अंमलदार अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अजित राऊत आणि राहुल माने यांच्या पथकाने केली. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group