• Contact us
  • About us
Friday, October 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरूरमध्ये पितळेचे बिस्कीट देऊन महिलेचे ३ तोळे सोने लुटणारा भामटा बीडमधून जेरबंद..!

mahaanewslive by mahaanewslive
October 4, 2026
in सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई; ४.५० लाखांचे दागिने जप्त! सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या

शिक्रापूर : गोड बोलून विश्वास संपादन करायचा, सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून अंगावरील दागिने लंपास करायचे आणि पोबारा करायचा… अशाच एका चलाख भामट्याचा शिक्रापूर पोलिसांनी बीडमध्ये जाऊन पर्दाफाश केला आहे. महिलेला पितळेचे बिस्कीट देऊन तिचे साडेचार लाख रुपये किमतीचे ३ तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) या २८ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जाण्यास निघाल्या होत्या. शिक्रापूर येथील चाकण चौकात वाहनाची वाट पाहत असताना अनोळखी आरोपीने त्यांच्याशी संवाद साधला. गोड बोलून त्याने दरेकर यांचा विश्वास जिंकला आणि त्यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळील एका झाडाखाली नेले.

    ​तेथे बोलण्यात गुंतवून त्याने दरेकर यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या कटरच्या सहाय्याने कापल्या, तसेच गळ्यातील सोन्याची पानपोतही काढून घेतली. त्यानंतर ‘हे तुमच्या सोन्यापेक्षा जास्त वजनाचे आहे’ असे सांगत त्यांच्या हातात हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे पितळेचे बिस्कीट टेकवले आणि तो पसार झाला. संशय आल्याने दरेकर यांनी ते बिस्कीट तपासले असता आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

    घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चाकण चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या पथकाने तातडीने बीड गाठून अभिमान तुपे याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्याकडून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक पानपोत असा एकूण ३ तोळे वजनाचा (किंमत सुमारे ४.५० लाख रुपये) सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. वृद्ध महिलेला फसवून आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी थेट बीड गाठले होते. मात्र, चाकण चौक आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्याचा चेहरा टिपला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाची अचूक सांगड घालत थेट आरोपीच्या गावात छापा टाकून त्याला जेरबंद केले.

    सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस फौजदार लहानू बांगर, पोलीस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे आणि शिवाजी चितारे यांच्या पथकाने केली.

    Next Post
    सॅम्सकॉन २०२६’ परिषदेत बारामतीच्या भूलतज्ज्ञ संघटनेचा डंका; पटकावला राज्यस्तरीय पुरस्कार

    सॅम्सकॉन २०२६' परिषदेत बारामतीच्या भूलतज्ज्ञ संघटनेचा डंका; पटकावला राज्यस्तरीय पुरस्कार

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

    October 15, 2026
    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

    October 15, 2026
    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

    आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

    October 15, 2026
    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

    October 15, 2026
    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

    October 15, 2026
    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

    October 14, 2026
    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    October 14, 2026
    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

    October 14, 2026
    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

    October 14, 2026
    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

    October 14, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group