• Contact us
  • About us
Friday, October 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकच दिवस.. एकच पोलीस ठाणे आणि लाचखोरीचे मात्र दोन सापळे..! एकाला अटक; दुसरा 95 हजार घेऊन पळाला!

mahaanewslive by mahaanewslive
October 1, 2026
in सामाजिक, सुरक्षा, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुरंदर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच घेताना खासगी माणूस एसीबीच्या जाळ्यात! तहसील कार्यालयाचा ‘पित्त्या’ होता काय?

अरेच्च्या! एकाच दिवशी एकाच पोलिस ठाण्यात लाचखोरीच्या दोन घटना! ११ हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत; तर कारवाईची चाहूल लागताच ९५ हजार लाचेची रक्कम घेऊन पोलिस हवालदार पळाला..!

शिरूर : महान्यूज लाईव्ह

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस स्टेशन बाहेर अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे तर दुसऱ्या कारवाईत ९५ हजार रुपयांची लाच घेऊन पोलीस कारवाईची चाहूल लागताच एका आरोपीने पोलीस चौकीच्या बाहेरून पळ काढला. एकाच दिवशी एकाच पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या दोन कारवाईमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलीस हवालदार शिवाजी बनकर यावर ११ हजार रुपयांची लाच स्वीकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस हवालदार सतीश मुंडे हा ९५ हजार रुपये लाचेची रक्कम घेऊन पसार झाल्याने त्यावर देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार शिवाजी बनकर याने ९५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी केली असता ४ हजार रुपये दिल्याचे मान्य झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर पोलीस स्टेशन बाहेर सापळा रचून शिवाजी बनकर याला ११ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार सतीश मुंढे याने सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ९५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची खबर लागताच पोलिस हवालदार सतीश मुंढे याने लाचेची स्वीकारलेली रक्कम घेऊन टाकळी हाजी पोलीस चौकीतून पळ काढला. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे आरोपी मुंढे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एकाच दिवशी झालेल्या दोन कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दुसऱ्या घटनेत आरोपीने लाचेची रक्कम घेऊन पळ काढला, मात्र लाचलुचपत विभागाच्या कारवाईची खबर लागलीच कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे. या पूर्वी देखील शिरूर तालुक्यात पोलिस व महसूल खात्यात लाचलुचपत विभागाच्या मोठ्या कारवाया झाल्या असून दोन्ही खाते बदनाम झाले आहे. शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत झालेल्या या कारवाईने पुन्हा तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.

Next Post
बारामतीत बिबट्याचा वाढता वावर… प्रशासन अजून किती झोपणार?

बारामती शहरात अनधिकृत बॅनर आणि फ्लेक्सबाजांवर पोलिसांची कारवाई सुरू; एकावर गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group