• Contact us
  • About us
Friday, October 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीत शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवरून राजकीय वाद पेटला; निकष धाब्यावर बसवल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप, सखोल चौकशीची मागणी!

mahaanewslive by mahaanewslive
September 27, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामती नगरपालिका लयच भारी ‘माझी वसुंधरा अभियानामध्ये प्रथम क्रमांक,५ कोटींचे पारितोषिक जाहीर! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

बारामती : बारामती नगरपरिषदेमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यावरून स्थानिक राजकारण तापले आहे. निविदेतील स्पष्ट अटी, शासकीय गुणवत्ता निकष आणि प्रत्यक्ष उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये मोठी तफावत उघडकीस आली असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल व पारदर्शक चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे गव्हाळे यांनी केली आहे.

निविदेच्या मूळ अटींनुसार शालेय गणवेशाचे कापड १०० टक्के पॉलिस्टर असण्यास सक्त मनाई होती. तसेच शर्टिंग कापडाचे जीएसएम (GSM) १२० ते १३० आणि शूटिंग कापडाचे जीएसएम २०० ते २१० असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, उपलब्ध भाटिया टेक्सलॅब्स (Bhatia Texlabs) अहवालानुसार शर्टच्या नमुन्यांमध्ये सरळसरळ १०० टक्के पॉलिस्टर आढळून आले आहे.

याशिवाय त्याचे जीएसएम अनुक्रमे ११८ आणि ११० इतके कमी नोंदवले गेले आहे. त्यामुळे निविदेतील तांत्रिक अटी सर्रास पायदळी तुडवून हा पुरवठा करण्यात आला का, असा थेट सवाल प्रशासनासमोर उभा राहिला आहे. निविदेतील अट क्रमांक १६ चा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, लॅब टेस्ट रिपोर्ट व अधिकृत नमुना नगरपरिषदेकडे सादर करून मंजुरी मिळाल्यानंतरच शिवणकाम सुरू करणे अनिवार्य होते. त्यामुळे मंजूर नमुना, लॅब रिपोर्ट, प्रत्यक्ष पुरवठा, गुणवत्ता तपासणी, बिल मंजुरी आणि प्रत्यक्ष वितरण या संपूर्ण साखळीचीच कसून चौकशी करण्याची गरज आहे.

हा केवळ कपड्यांचा तांत्रिक विषय नसून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा प्रकार असल्याचा घणाघात आरती शेंडगे गव्हाळे यांनी केला. कमी दरात काम पदरात पाडून घ्यायचे आणि नंतर गुणवत्तेत तडजोड करायची, ही वृत्ती इतर प्रामाणिक कंत्राटदारांवर अन्याय करणारी आणि स्पर्धा मारक ठरणारी आहे. हा खर्च जनतेच्या करातून उभारला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी तडजोड करून जनतेच्या पैशाची लूट अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

या गैरव्यवहाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडल्या आहेत. प्रत्यक्ष पुरवठ्याची तांत्रिक तपासणी करून मूळ नमुन्याशी त्याची पडताळणी करावी, निकृष्ट गणवेश आढळल्यास ते विद्यार्थ्यांना तात्काळ बदलून द्यावेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे बिल रोखावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गुणवत्ता निकषांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधितांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Next Post
एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि पेपरफुटी व इतर मुद्द्यांवर पुण्यात 2 ऑक्टोबरला विद्यार्थ्यांचा सत्याग्रह.. आमदार रोहित पवारांचं विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचं आवाहन!

एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा आणि पेपरफुटी व इतर मुद्द्यांवर पुण्यात 2 ऑक्टोबरला विद्यार्थ्यांचा सत्याग्रह.. आमदार रोहित पवारांचं विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचं आवाहन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group