• Contact us
  • About us
Saturday, October 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरासमोरील कुंपण पाडून ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न; माळेगावात पाच जण अटकेत!

mahaanewslive by mahaanewslive
September 19, 2026
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, ताज्या बातम्या, Featured
0
बारामतीत बिबट्याचा वाढता वावर… प्रशासन अजून किती झोपणार?

बारामती : माळेगाव परिसरातील शिवनगर येथे घरासमोरील सिमेंटच्या विटांचे कम्पाउंड परवानगीशिवाय ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाडल्याचा तसेच विरोध करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवनगर येथे घडली. फिर्यादी अविनाश बाळकृष्ण नरूटे यांच्या घरासमोरील कम्पाउंडकडे रणजीत लालासाहेब ढोले हा क्रमांक नसलेला ट्रॅक्टर घेऊन आला. ट्रॅक्टरच्या समोरील लोखंडी फरांडीने कम्पाउंडला वारंवार धडक देऊन ते पाडल्याने नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

कम्पाउंड पाडण्यास विरोध करण्यासाठी अविनाश नरूटे व त्यांचा भाऊ नंदकिशोर हे ट्रॅक्टर थांबविण्यासाठी गेले असता, रणजीत ढोले याने ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यामुळे गंभीर दुखापत होण्याची तसेच जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सुजित लालासाहेब ढोले, तेजम सुनिल ढोले, सुनिल शंकर ढोले आणि बाळासाहेब शंकर ढोले यांनी जमाव करून दगड व हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी अविनाश नरूटे यांच्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ११०, ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत लालासाहेब ढोले, सुजित लालासाहेब ढोले, तेजम सुनिल ढोले, सुनिल शंकर ढोले आणि बाळासो शंकर ढोले या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार लोंढे यांनी केली.

Next Post
सोमेश्वर कारखान्याच्या आखाड्यात उमेदवारीसाठी चुरस; ‘मलिदा गँग’ला दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची कार्यकर्त्यांची आक्रमक मागणी!

सोमेश्वर कारखान्याच्या आखाड्यात उमेदवारीसाठी चुरस; 'मलिदा गँग'ला दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची कार्यकर्त्यांची आक्रमक मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group