• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अकलूजच्या डीवायएसपी साठी हवालदाराने २५ लाखाची लाच मागितली.. वाघ तर अडकलाच, पण हकनाक आबाही अडकला..!

mahaanewslive by mahaanewslive
August 30, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अकलूजच्या डीवायएसपी साठी हवालदाराने २५ लाखाची लाच मागितली.. वाघ तर अडकलाच, पण हकनाक आबाही अडकला..!

५ लाख ५० हजारांची लाच मागितली; ₹५० हजार स्वीकारताना अधिकाऱ्यावर एसीबीचा सापळा!
लाचखोरीप्रकरणी कारवाई; पुणे एसीबीच्या पथकाची धडक कारवाई

पुणे : अकलूज मध्ये तक्रारदाराविरोधात आणि त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदार अनिल शिंदे हवालदार राहुल वाघ यांनी डीवायएसपी संतोष वाळके याच्यासाठी 25 लाख रुपये लाच मागितली तकडदराने नकार दिला मग तक्रार आणि त्याच्या भावा विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तिथूनच पुढे एक मोठं कांड घडलं! ज्याच्यात एक ड्रायव्हरही अडकला आणि आबा देखील!

ही लाचखोरीची कहाणी आहे, सोलापूरच्या अकलूज मधील! येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके याच्याकरिता दोन हवालदारांनी पाच लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली.  तक्रारदाराच्या भावाविरोधात आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हवालदार अनिल शिंदेने एक खाजगी व्यक्ती असलेला आबा वळकुंदे यांच्या मोबाईल फोनवरून तक्रारदाराशी संपर्क साधला आणि जर तुम्ही 25 लाख रुपये अगोदरच दिले असते, तर गुन्हाच दाखल झाला नसता असे सांगत आता अटकपूर्व जामीन मिळवायचा असेल आणि पीसी अँड पीएनडीटी ही अतिरिक्त गुन्ह्याची कलमे न लावण्यासाठी डीवायएसपीला 25 लाख रुपये द्या, सध्या त्यापैकी पाच लाख रुपये द्या अशी मागणी केली. 

त्यापैकी दहा लाख रुपयांची लाच हवालदार अनिल शिंदेने स्वीकारली व उर्वरित पंधरा लाख रुपयांची मागणी केली अशा स्वरूपाची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेकडे केली. पुणे शाखेने या संदर्भात 21 ऑगस्ट रोजी झालेल्या तक्रारीवरून 24 ऑगस्ट रोजी मागणीची पडताळणी केली. त्यावर खाजगी व्यक्ती असलेला आबा वळकुंदे याने तक्रारदाराकडे दोन्ही पंचासमक्ष पोलीस हवालदार अनिल शिंदे आणि डीवायएसपी संतोष वाळके या दोघांकरिता 25 लाख रुपयांची लाचेची मागणी केली आणि पुण्यातील इतर दोन आरोपींसाठी यापूर्वी हवालदार अनिल शिंदेने दहा लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा 27 ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यामध्ये खाजगी सम आबा वळकुंदे आणि महादेव माने या दोघांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि भारतीय न्याय संहिता 35 अन्वये नोटीस देण्यास सांगतो, असे बोलून तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके याच्यासाठी पाच लाख रुपये आणि पोलिस हवालदार वाघ याच्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली.

ही रक्कम 28 ऑगस्ट रोजी घेऊन येण्यास सांगितले. त्यावरून लाचलचपत प्रतिबंधक विभागाने 28 ऑगस्ट रोजी सापळा रचला आणि आबा वळकुंदे व खाजगी व्यक्ती महादेव माने या दोघांना हवालदार वाघ याच्यासाठी साडेपाच लाख रुपयांची रक्कम पालखी महामार्गावरील माळशिरस पिलीव रोडच्या पुलाखाली जानकर प्लॉट शेजारी स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक नीता मिसाळ, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्यासह पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहाय्यक फौजदार राजेश भाटे, कॉन्स्टेबल प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनवणे व चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डीवायएसपीवर कारवाई कधी?

दरम्यान या प्रकरणात सारी सूत्रे, डीवायएसपी संतोष वाळके याच्यासाठी सुरू होती, असं देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एकूण पडताळणीमध्ये दिसून येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एकूण कारवाईतील मिनिट्स मध्ये ते नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता यामध्ये जे प्रत्यक्षात अडकले आहेत, ते खाजगी व्यक्ती आणि हवालदार दर्जाचे पोलीस आहेत. मात्र ज्याच्या भरवशावर बिनदिक्कतपणे हे लोक लाच मागत होते, तो वरिष्ठ अधिकारी असलेला संतोष वाळके याच्यावर कारवाई होणार का? आणि नेमकी काय कारवाई होणार? याकडेही अकलूज करांचे आणि सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Next Post
बारामतीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; दोन दिवसांत दुसरी घटना! तांदुळवाडी वेस चौकातील प्रकार सीसीटीव्हीत कैद!

बारामतीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; दोन दिवसांत दुसरी घटना! तांदुळवाडी वेस चौकातील प्रकार सीसीटीव्हीत कैद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group