• Contact us
  • About us
Thursday, October 22, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॅग खाली ठेवली अन् जीव वाचवण्यासाठी धावले डॉक्टर! गाडीतच प्रसूती; श्वास नसलेल्या नवजात बाळाला ‘ICU’मध्ये नेऊन दिले जीवदान..!

mahaanewslive by mahaanewslive
August 30, 2026
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मराठवाडा, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
बॅग खाली ठेवली अन् जीव वाचवण्यासाठी धावले डॉक्टर! गाडीतच प्रसूती; श्वास नसलेल्या नवजात बाळाला ‘ICU’मध्ये नेऊन दिले जीवदान..!

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला डॉ. निखिल गव्हाणे यांची माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठेची हृदयस्पर्शी अनुभूती

गेवराई : डॉक्टरकी हा केवळ व्यवसाय नसून संकटाच्या क्षणी एखाद्याचा जीव वाचविण्याची जबाबदारी आहे, याचा प्रत्यय गेवराई येथे घडलेल्या एका प्रसंगातून आला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला गंभीर अवस्थेतील एका गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती करून आईचा जीव वाचविण्यासोबतच श्वासोच्छ्वास व हृदयाचे ठोके नसलेल्या नवजात बाळाला तातडीने उपचार देत त्याला जीवदान देण्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल अनंत गव्हाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

डॉ. गव्हाणे हे नेहमीप्रमाणे आपली बॅग घेऊन गेवराई येथील शारदा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पोहोचले होते. त्याचवेळी त्यांची नजर एका वाहनाकडे गेली. त्या वाहनातून गंभीर अवस्थेतील गरोदर महिलेला रुग्णालयात आणण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच डॉ. गव्हाणे यांनी तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधला. मात्र, त्या क्षणी संबंधित तज्ज्ञ रुग्णालयात उपलब्ध नव्हते.

वेळ अत्यंत कमी आणि परिस्थिती अत्यंत गंभीर होती. महिलेची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे लक्षात येताच डॉ. गव्हाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील वैद्यकीय बॅग खाली ठेवली आणि वाहनाच्या दिशेने धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वाहनातच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

रुग्णालयातील ब्रदर आणि सिस्टर यांनीही तत्परतेने आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत वाहनातच प्रसूती करण्यात आली. त्यानंतर आईचा जीव धोक्याबाहेर आला; मात्र संकट अद्याप टळले नव्हते.

नवजात बाळ जन्मल्यानंतर रडत नव्हते. त्याचा श्वास सुरू नव्हता आणि हृदयाचे ठोकेही जाणवत नव्हते.
क्षणभरही न थांबता डॉ. गव्हाणे यांनी बाळाला तातडीने ताब्यात घेतले आणि उपचारांसाठी ICUच्या दिशेने धाव घेतली. आईला पुढील उपचारांसाठी हलविण्याची जबाबदारी त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर सोपविली. ICUमध्ये बाळावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

बाळाला इंट्युबेशनची गरज भासली. डॉक्टरांनी आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू ठेवत अखेर बाळाचा श्वास पुन्हा सुरू करण्यात यश मिळविले.
काही वेळाने बाळाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि अखेर त्या नवजात बाळाने रडण्याचा आवाज केला. त्या क्षणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. सध्या आई आणि बाळ दोघेही सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘याजसाठी केला होता अट्टहास…’
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचा धागा. अशाच या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला एका आईचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचविण्यासाठी डॉ. निखिल गव्हाणे यांनी केलेली धडपड माणुसकीचा सुंदर संदेश देऊन जाते.
एखाद्या संकटग्रस्त रुग्णाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे किती महत्त्वाचे असते, याची जाणीव या प्रसंगातून पुन्हा अधोरेखित झाली. ‘रुग्ण प्रथम’ या भावनेतून क्षणाचाही विलंब न करता घेतलेला निर्णय आणि त्यानंतरची धावपळ यामुळे दोन जीव सुरक्षित झाले.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एका बहिणीला आणि तिच्या बाळाला मिळालेली ही भेट कोणत्याही मौल्यवान वस्तूपेक्षा मोठी आहे. कारण या भेटीत जीवन आहे, माणुसकी आहे आणि डॉक्टरकीच्या पेशातील कर्तव्यनिष्ठेची खरी ओळख आहे. डॉ. निखिल अनंत गव्हाणे यांच्या या तत्परतेचे, धाडसाचे आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. संकटाच्या क्षणी ‘डॉक्टर’ म्हणून नव्हे, तर एका जीवासाठी धावणारा माणूस म्हणून त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.

Next Post
सुरूरच्या पुलाखाली देशी पिस्तूल घेऊन होता उभा; पोलिसांनी आवळल्या मुसक्या! ४५ हजारांचे पिस्तूल जप्त; प्रसाद बागलला चार दिवसांची पोलीस कोठडी

सुरूरच्या पुलाखाली देशी पिस्तूल घेऊन होता उभा; पोलिसांनी आवळल्या मुसक्या! ४५ हजारांचे पिस्तूल जप्त; प्रसाद बागलला चार दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group