इंदापूर : महान्युज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखाना दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक सभासदांची राहिलेली देणे पूर्ण करणार असून कामगारांची ही मागणी पूर्ण करेल सर्वांना न्याय मिळेल असे छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नवीन युनिट चा चौथा गळीत हंगाम बॉयलर अग्नीप्रदीपन आज कारखान्याचे संचालक दिपक सुर्यकांत निंबाळकर व त्यांच्या पत्नी प्रमोदिनी दीपक निंबाळकर यांच्या हस्ते तर जुन्या युनिटचा बॉयलर अग्नीप्रदीपन कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल हेमंतराव पाटील व त्यांच्या पत्नी सोलापूरच्या पोलिस उपायुक्त वैशाली पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी काटे बोलत होते.
ते म्हणाले, मागील वर्षी देखील हक्काचा कारखाना म्हणून सभासदांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आपला ऊस घातला त्याबद्दल सभासदांचे अभिनंदन करतो. मागील वर्षी एक लाख टन पेक्षा जास्त काळ होणार नाही अशी चर्चा केली जात होती, मात्र प्रतिकूल परिस्थितीत देखील छत्रपती कारखान्याने सव्वा चार लाख टन उसाचे गाळप केले. खरेतर आजच्या परिस्थितीमध्ये व्यापारी साखर उचलत नाहीत, व्याजाचा प्रेशर वाढत आहे. परंतु अशा अडचणी सतत येत नाहीत.
ते पुढे म्हणाले, यावर्षी व पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर होईल आणि कारखाना नवीन निर्मिती व विस्तार वाडीच्या कर्ज कर्जातून मुक्त होईल. या वर्षी ऊस तोड यंत्रणेचे करार पूर्ण झालेले आहेत. यावर्षी 12 लाख टन ऊस गाळपाचे नियोजन आहे आणि ते पूर्ण होईल. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे दोन हंगाम अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्वांनी या हंगामात सहकार्य करावे. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक कामगार व सभासद उपस्थित होते.










