इंदापूर : महान्युज लाईव्ह
आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम सुरू होता, त्याच वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विकास उर्फ नानजी बाबर यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना छत्रपती कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी लागलीच ताब्यात घेतले.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता
छत्रपती कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपनाचा कार्यक्रम सुरु होता. कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील व त्यांच्या पत्नी आणि सोलापूरच्या पोलिस उपायुक्त वैशाली पाटील यांच्या हस्ते होमहवन कार्यक्रम सुरू असताना अचानक घोषणा देत विकास बाबर पाठीमागून आले. त्यांनी रॉकेल अंगावर ओतून घेत, छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादकांची राहिलेली एफआरपी देत नाही यावरून संचालक मंडळाचा निषेध करीत अंगावर रॉकेल ओतले. त्यामुळे सारेच गडबडून गेले अचानक घडलेल्या या प्रकाराने सारेच गोंधळून गेले, मात्र कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेऊन बाजूला नेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या प्रकारानंतर कारखान्याचे अध्यक्ष तीव्र नापसंती व्यक्त करीत या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली
पोलीस सदैव दक्ष असतो
विकास बाबर हे अंगावर रॉकेल ओतून येत असताना सारे गडबडले होते, परंतु याही स्थितीमध्ये पोलीस उपायुक्त वैशाली पाटील यांनी पूजेमध्ये असतानादेखील एका क्षणात उठून नानाजी बाबर यांना धरले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. खरे तर वैशाली पाटील या ठिकाणी पाहुण्या म्हणून आल्या होत्या, परंतु तिथे देखील त्यांच्यातील पोलीस अधिकारी जागा झाला या गोष्टीची बराच वेळ परिसरात चर्चा होती.










