इंदापूर : महान्युज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्यात गेली दोन वर्ष एकत्रित हंगामी सेवक म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी आज कारखान्याच्या बॉयलर अग्नि प्रदीप कार्यक्रमावेळी आम्हाला कायम सेमेंत सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी केली.
छत्रपती कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना सध्या अकरा हजार रुपये एकत्रितरीत्या वेतन दिले जाते. सध्या वाढलेल्या महागाईच्या काळात एवढ्या कमी वेतनात उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.
हे सर्व कामगार हंगामी असल्याने बिगर हंगामाच्या काळात हे सर्व कामगार घरी असतात. छत्रपती कारखान्यातील कायम हंगामी व या हंगामी सेवकांच्या पगारामध्ये जवळपास दहा ते अकरा हजार रुपयांचा फरक आहे असे या कामगारांचे म्हणणे आहे. कोरोना कालखंडात देखील हे सर्वजण कायम हंगामी कामगारांच्या बरोबरीने काम करीत असल्याने आम्हा सर्वांना कायम हंगामी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी या कामगारांनी केली.











