• Contact us
  • About us
Saturday, October 24, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशव्यापी बंद; १२.५० लाख औषध विक्रेते आंदोलनात सहभागी होणार!

tdadmin by tdadmin
May 18, 2026
in सामाजिक, सुरक्षा, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, Featured
0
बारामतीच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील पालकांनो, वेळीच सावध व्हा.. विषय फक्त टर्मिनच्या इंजेक्शनचा नाही.. उद्या अख्खी पिढी ड्रग्जच्या विळख्यात जाईल..

पुणे : ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करत महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने पत्रकार परिषदेत दिली. औषध व्यवसायावर वाढत्या ऑनलाईन कंपन्यांच्या प्रभावामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, औषध व्यवसाय हा ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट १९४०’ अंतर्गत येतो. मात्र, या कायद्यात ऑनलाईन औषध विक्रीसाठी कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नाही. केंद्र सरकारने २०१८ मध्ये यासंदर्भात अधिसूचना काढली होती, परंतु तिचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही.  दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली असतानाही देशात बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी दिलेली सवलत सरकारने अद्याप मागे घेतलेली नसल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ग्राहकांना २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देत असल्याने छोट्या औषध विक्रेत्यांना स्पर्धेत टिकणे कठीण झाले आहे.

ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर २०१३ नुसार किरकोळ औषध विक्रेत्यांचा नफा १६ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. हा निर्बंध हटवून औषध विक्रेत्यांना ‘ब्रँड सबस्टिट्यूट’ औषधे देण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संबंधित केंद्रीय मंत्र्यांना वारंवार निवेदने देऊनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव अनिल नवंदर यांनी हा बंद राज्यात शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

Next Post
धक्कादायक! अमरावतीत तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू; नाशिकमध्येही दोन चिमुकले पाण्यात बुडाले!

धक्कादायक! अमरावतीत तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू; नाशिकमध्येही दोन चिमुकले पाण्यात बुडाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group