डॉ. संदेश शहा, इंदापूर
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सर्व आरोग्य चिकित्सा पध्दतीने एकत्र काम करणे गरजेचे आहे.
कोरोना महामारी ही विषाणूजन्य जागतिक महामारी असून विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर त्याची राज्यात राजधानी बनली आहे. त्यामुळे नागरिकांनी शासकीय निर्देशांचे पालन कटाक्षाने करणे गरजेचे असून या महामारीस प्रतिबंध करण्यासाठी सर्व उपचार पद्धतीत समन्वय असणे गरजेचे आहे.
कोरोना समूह संसर्गास रोखून त्यावर मात करण्यासाठी शासनाने सर्वसमावेशक औषधोपचार पद्धतीचा अवलंब केल्यास कोरोनाचा मृत्युदर नक्कीच कमी होईल. महामारीमुळे भारतीय आयुर्वेदास जागतिक स्तरावर आरोग्य नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध झाली होती, मात्र शासनाने त्यासाठी व्यापक व सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र शासनाची त्यासाठी दूरदृष्टी दिसून न आल्याने भारतीय आयुर्वेदाने आपली उपयुक्तता जागतिक पातळीवर सिद्ध करण्याची संधी गमावली आहे.
आपल्या देशात ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, निसर्गोपचार चिकित्सा पद्धतीस जनमान्यता तर ऍलोपॅथीस राजमान्यता आहे. आपली सर्व आरोग्य व्यवस्था ऍलोपॅथीच्या हातात आहे. राष्ट्रीय महामारीच्या काळात सुद्धा ते आपलीमक्तेदारी सोडण्यास तयार नाहीत.
खरे तर त्यांची काही औषधे रोगप्रतिकारक शक्ती दाबणारी आहेत. त्यामुळे कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर रुग्णांना पहिल्या दिवसापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधे सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग तसेच या आजाराची भीती देखील कमी होवून मृत्यूचे प्रमाण देखील कमी होईल. यापूर्वी विषाणू तसेच जिवाणूजन्य महामारीवर होमिओपॅथीने जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मात्र शासनाची आरोग्य व्यवस्था ऍलोपॅथीच्या हातचे बाहुले बनले असल्याने सरकारची सारासार विचार करण्याची मती कुंठित झाली असल्यानेदेशात आरोग्य आणीबाणी जन्य स्थिती निर्माणझाली आहे. त्यामुळे शासनाने तुकाराम मुंढेसारख्या शिस्तबद्ध व्यक्तीच्या हाती कोरोना व्यवस्थापन देणे गरजेचे आहे.
आतापर्यंत काय चुकले किंवा बरोबर आले, त्यापेक्षा गेली 5 महिन्यापासून सर्व उपाय योजना केल्यानंतर देखील कोरोना वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे. जनतेस आरोग्य देण्याची जबाबदारी शासनाची असली तरी देखील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. आपले नाक व तोंड यावरून मास्क काढून बोलण्याचा आत्मघातकी प्रकारकोणीही करू नये, कारण आपल्या पाठीमागेआपला परिवार, समाज, देश व राष्ट्र असल्याचे भान सर्वांनी ठेवल्यास या आजारावर नक्की मात करता येईल.
सध्या कोरोना संसर्गात रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाही. बेड मिळाला तर तेथे सौजन्याची वागणूक मिळत नाही. त्यामुळे अनावश्यक भीती वाढत चालली आहे. बेड, आवश्यक इंजेक्शन, औषधेमिळवूनदेण्यासाठी दलाल तयार झाले असून हा काळाबाजार रोखला पाहिजे.यामध्ये कुणाचाही मुलाहिजा ठेवू नये. महामारीत राजकारण न करता प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठीशासनाने प्रत्येक तालुकास्तरावर सर्व चिकित्सा पद्धतीचे सर्व समावेशक सुसज्ज रुग्णालय उभे करून भविष्यातील महामारी रोखण्यासाठी आतापासून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
जागतिक महामारीत सर्व चिकित्सा पद्धतींनी एकत्रित सर्वसमावेशक पद्धतीने प्रयत्न केल्यास कोरोनाचा मृत्युदर निश्चित कमी होईल, पुणे कोरोनामुक्त होण्यासाठी आदर्श पॅटर्न तयार करणे गरजेचे आहे.
लेखकाला इथे संपर्क साधा : डॉ. संदेश शहा, अध्यक्ष, आरोग्य संदेश प्रतिष्ठान, इंदापूर, जि. पुणे. होमिओपॅथिक चिकित्सक, पुणे विद्यापीठ. मो 9922419159
ई-मेल : drsandeshshah@rediffmail.com, drsandeshshah108@gmail. com











