दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील व्यावसायिक फोटोग्राफरचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने दौंड लिंगाळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी अज्ञात खूनीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटू उर्फ केदार भागवत ( वय 46 रा. लिंगाळी ) असे या फोटो ग्राफरचे नाव आहे. आज रविवारी (ता.4 ) सकाळी केदार भागवत यांचा मृतदेह लिंगाळी हद्दीत सापडला. घटना स्थळी दारूच्या बाटल्या, हत्येसाठी वापरलेला दगड असल्याचे पोलीसांनी निदर्शानास आले.
घटनेची माहिती मिळताच दौडचे उपविभागीय प्रभारी पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप भाकरे, धनजंय दाभाडे, सचिन बोराडे, अमोल गवळी आदींनी घटना स्थळाची पाहणी केली. पोलीसांनी या खुनाचा लवकरच उलगडा करण्याचे आश्वासन भागवत यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांना दिले असून अज्ञात व्यक्ती विरोधात दौंड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










