मुंबई : महान्यूज लाईव्ह
सारथी संस्थेमार्फत ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या NMMS परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने याचा सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला घेतले आहे.
रोहित पवार यांनी या संदर्भात टीकेचे लक्ष करताना मुख्यमंत्र्याच्या नावावर काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये दोन दोन पाने भरून निनावी नावाने जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्याचा संदर्भ घेत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील व देशातील वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातींपेक्षा 70000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी खर्चाची असल्याचाही टोला त्यांनी लगावला आहे.
त्यांनी नमूद केले की, मराठा समाजासाठी सर्वकाही आम्हीच केलं असा आविर्भाव ठेवणारे आज गरीब मराठ्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद करतायेत, हा विरोधाभास आहे. वर्तमानपत्रात दिलेल्या निनावी जाहिरातीच्या निम्मे पैसेही या शिष्यवृत्तीसाठी लागणार नाही. त्यामुळं सरकारने या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने सुरू करावी, निधी अभावी शिष्यवृत्ती मिळत नसल्याची परिस्थिती बार्टी, महाज्योती या संस्थांमध्येही असून त्यांनाही निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.











