जेजुरी : महान्यूज लाईव्ह
जेजुरीत झालेल्या भीषण अपघातात महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी सव्वासातच्या दरम्यान घडली. जेजुरीकडून इंदापूर कडे जाणाऱ्या कारची धडक झाल्याने हा अपघात घडला.
जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्वीट कार आणि पिकअप टेम्पोचा हा अपघात झाला. जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनी समोर स्विफ्ट कार व पीकअप टेम्पोचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महीले सह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.
जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलमध्ये पीकअप टेम्पो मधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. यावेळी जेजुरी कडून इंदापूर कडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली.
या अपघातात टेम्पोतून साहित्य खाली उतरविणारे सहाय्यक, हॉटेलचे मालक व कारमधील प्रवासी असे आठ जण जागीच ठार झाले. यात दोन मुले, एक महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नावे समजू शकली नाहीत.











